शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीच्या बैठकीला शिराळकरांची दांडी

By admin | Updated: July 18, 2014 23:58 IST

दीपेंद्रसिंह कुशवाह : आदेशाचे पालन करा; जिवंत नाग पकडून त्याची पूजा व खेळविण्याचा प्रयत्न करू नये

सांगली : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिराळा येथील ग्रामस्थांनी नागपंचमी साजरी करावी. जिवंत नाग पकडून त्याची पूजा व त्याला खेळविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस व प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यासाठी कुशवाह यांनी बोलाविलेल्या प्रबोधनात्मक बैठकीला शिराळकरांनी दांडी मारली. यावरून त्यांचा या आदेशाला विरोध असल्याचे दिसून येते. कुशवाह म्हणाले की, जिवंत नाग पकडण्यास बंदी आहे. त्यामुळे नागप्रेमी मंडळांनी कुठेही नाग पकडू नये. शिराळ्यातील एकही मंडळ नोंदणीकृत नाही. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. जिवंत नाग पकडून त्याची पूजा करू नये, तसेच त्याला खेळवू नये, असा १९७२ ला कायदा झाला आहे. तरीही त्याची अंमलबजावणी करण्याची ग्रामस्थांची तयारी नसल्याचे दिसून येते. मात्र आता आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. ग्रामस्थांच्या भावना व श्रद्धा दुखावण्याचा आमचा प्रयत्न नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. नागपंचमीला अजून तेरा ते चौदा दिवसांचा कालावधी आहे. या काळात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जाईल. गाव बंद ठेवून ते या निकालाचा निषेध करीत असले तरी, त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याचे पालन करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. ते म्हणाले की, न्यायालयाने काय आदेश दिला आहे, नागपंचमी कशी साजरी करावी, यासंदर्भात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. शिराळ्यात प्रशासनातर्फे पोस्टर्स लावली जाणार आहेत. प्रसिद्धीपत्रकांचेही वाटप केले जाणार आहे. प्रबोधन करण्याची ग्रामपंचायतीचीही जबाबदारी आहे. विशेष सभा बोलावून त्यांनी तसा ठराव करून घ्यावा. सरपंचांनाही न्यायालयाच्या आदेशाला विरोध करता येणार नाही. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी आज कार्यालयात बैठक बोलाविली होती. मात्र एकाही ग्रामस्थाने बैठकीला हजेरी लावली नाही. (प्रतिनिधी) या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत उपस्थित होते. ते म्हणाले की, न्यायालयाचा आदेश झुगारून कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस यंत्रणा सक्षम आहे. नागपंचमीदिवशी बाहेरून बंदोबस्त मागविण्याची गरज आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील पोलीस सक्षम आहेत. यापूर्वी नागपंचमी साजरी करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे. आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.