शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिराळकरांनी जीव धोक्यात घालून विहिरीत पडलेल्या नागाला वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:10 IST

शिराळा : नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ्याचे ग्रामस्थ स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाचा प्राण वाचवतात, असे अनेक प्रसंग घडले आहेत. ...

शिराळा : नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ्याचे ग्रामस्थ स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाचा प्राण वाचवतात, असे अनेक प्रसंग घडले आहेत. असाच प्रसंग कापरी- इंग्रुळ खडी (ता. शिराळा) येथे आज घडला. पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या नागास शिराळकरांनी जीवदान दिले.इंग्रुळ खडी येथील शंकर पाटील यांच्या ५० फूट पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत नाग पडला होता. अमर पाटील यांनी हा नाग पहिला व त्याची माहिती शिराळा येथील शिवछावा स्पोर्टस् क्लबचे प्रशिक्षक प्राध्यापक सुशीलकुमार जयवंतराव गायकवाड यांना दिली. सुशीलकुमार व धीरज हे जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरले. तसेच खेळाडू अवधूत पाटोळे, सागर माळी, सौरभ शिंदे तसेच शिवछावा क्लबच्या खेळाडूंनी एका दोरखंडाने प्लास्टिक पोते व काठी विहिरीत सोडली.जवळजवळ तीन तास अथक प्रयत्न करून हा नाग पकडून पोत्यामध्ये घालून दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीबाहेर काढला. घटनेची माहिती वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक यांना दिली. त्यानंतर वनपाल सचिन पाटील घटनास्थळी आले. नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्याठिकाणी डॉक्टरांनी नागाची तपासणी केली. त्यानंतर या नागास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. शिराळकरांनी यापूर्वी नांगरट करताना नांगरात अडकून जखमी झालेले, बोअर-विहिरीत अडकलेले, वाहनांच्या धडकेत जखमी झालेले, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अनेक नाग वाचवले आहेत. इतर कोणत्याही ठिकाणी सर्प पाहिला की त्यास मारले जाते; मात्र शिराळा येथे सर्प तसेच नागाचा जीव वाचवला जातो. वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून सापाला वाचवले जाते.खाऊ घालून सोडलेनाग विहिरीत पडल्याने दोन दिवस उपाशी असावा, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर या सर्व शिराळकरांनी पाहुण्या नागाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर खाऊ घालून सुरक्षितस्थळी सोडले.