शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडीचा रानमेवा शिराळ्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

पुनवत : दरवर्षी एप्रिल महिन्यापासून ग्रामीण भागात लोकांना रानमेव्याची चाहूल लागले. शाहूवाडी तालुक्यातील डोंगर कपारीत राहणारे बांधव ...

पुनवत :

दरवर्षी एप्रिल महिन्यापासून ग्रामीण भागात लोकांना रानमेव्याची चाहूल लागले. शाहूवाडी तालुक्यातील डोंगर कपारीत राहणारे बांधव उदरनिर्वाहासाठी हा रानमेवा शिराळा पश्चिम भागातील गावागावात फिरून विकतात. करवंदं, जांभळांची चव चाखायला अजून वेळ असला तरी ‘नेरली’ नावाचा रानमेवा मात्र आता विक्रीला येऊ लागला आहे.

शिराळा तालुक्यात एप्रिल, मे , जून या महिन्यात प्रतिवर्षी खवय्यांना रानमेव्याची चव चाखायला मिळते. शिराळा पश्चिम व लगतच्या शाहूवाडी तालुक्यातील डोंगरदऱ्या या रानमेव्याचे उगमस्थान आहे. शिराळ्यापेक्षा शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, पुसार्ळे, आळतूर, उदगिरी भागातील धनगर बांधव प्रतिवर्षी जंगलातील जांभळं, कारवंदं , काजू, चिकन्या, नेरली, डोंबलं आदी रानमेवा तोडून ते गावागावात फिरून विकतात. डोंगरभागात या बांधवांना उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने हा रानमेवाच त्यांच्या चरितार्थाचा आधार बनतो.

पुनवत, खवरेवाडी भागात ही नेरली विक्रीसाठी येऊ लागली आहेत. नेरलीबरोबरच आळूही विक्रीसाठी येऊ लागले आहेत. जांभळं, कारवंदं, पिकायला अजून थोडा काळ जावा लागणार आहे.

एकंदरीत रानमेव्याच्या विक्रीतून या बांधवांना चरितार्थाचे साधन मिळाले असून, गतवर्षी कोरोनामुळे हुकलेला हंगाम यंदातरी लाभणार का? ही चिंता त्यांना सतावू लागली आहे.