शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली संस्थानच्या गणपतीला शाही निरोप

By admin | Updated: September 10, 2016 00:42 IST

विसर्जन मिरवणूक : भाविकांची अलोट गर्दी; ढोल, ताशे, झांज, लेझीम, सनई-चौघडे, बॅन्डचा निनाद

सांगली : येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणरायाला शुक्रवारी पाचव्यादिवशी शाही विसर्जन मिरवणुकीद्वारे भावपूर्ण निरोप देण्यात आला. राजवाड्यातील दरबार हॉलपासून सरकारी घाटापर्यंत रथातून श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आणि सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून विसर्जन झाले. विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दुपारी तीन वाजता ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. ‘श्रीं’ची विधिवत पूजा झाल्यानंतर दरबार हॉलमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, पौर्णिमा पटवर्धन या मुलींसह जावई हिमालय, नातू अभिमन्यू दासानी, अभिनेत्री शिबा, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. पानसुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये महापौर हारूण शिकलगार, माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, शेखर माने, जनसुराज्यचे नेते समित कदम, मानसिंग शिंदे, अनिल पाटील-सावर्डेकर सहभागी झाले होते. मिरवणुकीत घोडेस्वार, भालदार, चोपदार, नादप्रतिष्ठाचे ढोल-ताशा, ध्वजपथक, सांगलीवाडी येथील दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालयाचे लेझीमपथक, हलगीपथक, सनई-चौघडा यासह गंधर्व बँड सहभागी झाला होता. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. सुरुवातीला मिरवणूक काही काळ राजवाडा चौकात थांबविण्यात आली. त्यानंतर पटेल चौक, गणपती पेठ मार्गे मिरवणूक गणपती मंदिर येथे आल्यानंतर श्रींची आरती झाली. मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीकरांसह ग्रामीण भागातून व कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले व प्रसादाची उधळण करण्यात येत होती. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गणपतीपेठेतून मिरवणूक जाताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर भाविकांनी मोठा जयघोष केला. त्यानंतर टिळक चौक मार्गे मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर पोहोचली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवूने ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ अशा जयघोषात श्रींची मूर्ती सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. (प्रतिनिधी)जावई, नातू परंपरा चालवतील : विजयसिंहराजे‘वयाची ७४ वर्षे पूर्ण करून आता मी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदापासून संस्थान गणपतीच्या उत्सवात जावई हिमालय व नातू अभिमन्यू हेही सहभागी झाले आहेत. ही परंपरा त्यांनी अशीच पुढे चालवावी, अशी माझी इच्छा आहे. मला शक्य आहे तोपर्यंत मी या उत्सवात सहभागी होणार आहे. त्यानंतर पटवर्धन घराण्याची पुढील पिढी ही परंपरा कायम ठेवेल’, असे भूतपूर्व संस्थानचे अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शिबाचा नवससंस्थानच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री शिबा याही सहभागी झाल्या होत्या. दरबार हॉलमधील श्रींच्या विधिवत पूजेवेळी त्या उपस्थित होत्या. ‘गणरायाच्या चरणी मी नवस बोलण्यासाठी आले आहे. माझा नवस पूर्ण झाल्यावर पुढीलवर्षी मी देवाकडे काय मागितले, ते सांगेन’, असे त्या म्हणाल्या.