शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहाबाजचा मृत्यू वीज तोडताना

By admin | Updated: December 14, 2015 00:03 IST

वळसंग येथील प्रकार : केवळ पाचशे रूपयांसाठी जीव गमावला

जत : तालुक्यातील वळसंग येथील शहाबाज हजरत मुल्ला (वय २५) याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला नसून, भीमाण्णा अण्णाप्पा तेली (वय ५८) व त्यांचा मुलगा अनिल भीमाण्णा तेली ( ३०, रा. दोघे वळसंग, ता. जत) यांनी पवनऊर्जा निर्माण कंपनीकडून आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी पाचशे रुपयांचे आमिष दाखवून त्याला विद्युत पोलवर चढवून विद्युत जनित्र उडवून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भीमाण्णा व त्याचा मुलगा अनिल यास जत पोेलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वळसंगपासून दोन किलोमीटर अंतरावर तेली मळा आहे. तेथे भीमाण्णा अण्णाप्पा तेली व मलकारी अणाप्पा तेली यांची समाईक शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या समाईक बांधावरून पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीचे खांब व त्यावरून वीज वाहिनी गेली आहे. यासंदर्भात संबंधित पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या व्यवस्थापनाने मलकारी तेली यांच्याबरोबर करारपत्र करून त्यांना आर्थिक नुकसानभरपाई दिली आहे. ही नुकसानभरपाई भीमाप्णा तेली याला मिळाली नाही, त्यामुळे ते स्वत: व त्यांचा मुलगा अनिल पवन ऊर्जा निर्माण कंपनीवर चिडून होते.१ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान शहाबाज मुल्ला यास पाचशे रुपये देतो, असे आमिष दाखवून त्यास तेली मळ््यातील बांधावर नेले. नायलॉनच्या दोरीला लोखंडी हुक लावून ती वीज वाहक तारेवर टाकण्यात आली. तेथील तीन वीज वाहक तारा दोरीने एकत्र बांधून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना, तारा अचानक खाली आल्या व बांधावर उभा असलेल्या शहाबाज मुल्ला याचा त्या तारांना स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुल्ला हे शेतात गेले असता, विजेचा शॉक लागून अचानक मृत्यू झाला आहे, अशी फिर्याद सुरुवातीस जत पोलिसात दाखल करण्यात आली होती. विद्युत खांबावरून खाली आलेल्या वीज वाहक तारा, लोखंडी हुक, नायलॉनची दोरी घटनास्थळी पडली होती. यासंदर्भात गावात उलट-सुलट चर्चा सुरू होती. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी घटनेची सखोल चौकशी केली असता, भीमाण्णा तेली व त्यांचा मुलगा अनिल या दोघांनी शहाबाज यास पैशाचे आमिष दाखवून विद्युत खांबावर चढविले व संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी शहाबाज याची आत्या आशाबी गुलाब मुल्ला (वय ५०, रा. वळसंग, ता. जत) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भीमाण्णा व अनिल यास अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, सुरुवातीस दोन दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (वार्ताहर)सर्वसामान्यांचा बळी : प्रशासनाचे दुर्लक्षपवनऊर्जा निर्माण कंपनीची वीज वाहिनी किंवा विद्युत पोल एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधून जात असतील तर, कंपनीचे दलाल आणि शेतकऱ्यांना लॉटरी लागली, असे येथे मानले जाते. परंतु कंपनी व्यवस्थापन, शेतकरी व दलाल यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा बळी जाऊ लागला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.