शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटमाथ्यावर दुष्काळाची छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पाऊस न झाल्याने, या परिसरातील तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पाऊस न झाल्याने, या परिसरातील तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाऊसच झाला नसल्याने नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा चाराही तयार झालेला नाही. त्यामुळे भीषण पाणी व चाराटंचाई जाणवू लागली आहे.खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर असून जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसाच्या ओलीवर बळीराजाने मोठ्या धाडसाने पेरा केला. पिके चांगली तग धरु लागली. परंतु तद्नंतर पावसाने पाठ फिरविल्याने पिके करपू लागली असून, सध्या पावसाऐवजी कडक ऊन पडत असल्याने पूर्ण पिके वाया जाऊ लागली आहेत. त्यामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घाटमाथ्यावर शिवारात पिके करपू लागली आहेत.पाण्याची ऐन पावसाळ्यात तीव्र टंचाई जाणवू लागली असून ऐन पावसाळ्यात घाटनांद्रे, जाखापूर, कुची वस्ती भागात टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. टॅँकर हे गेल्या वर्षभरापासून सुरु असून, या पट्ट्यात कुची वगळता कुठेही सिंचन योजनेचे काम झालेले नाही. पाच गावांसाठी मंजूर असणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली असून घोषणेशिवाय कोणतीही ठोस कारवाई याबाबत झाली नाही. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची असणारी वाघोली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर येथे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.या पट्ट्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी वरिष्ठ पातळीवर केवळ घोषणा करतात, पण स्थानिक पातळीवरील नेते याबाबत कोणतेही नेतृत्व करण्यास तयार होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.सरकारकडून जनतेची केवळ चेष्टाघाटमाथ्यावरील जनता प्रखर दुष्काळाला तोंड देत असताना, टेंभू योजनेचे केवळ गाजर दाखवून चेष्टा केली जात आहे. या प्रश्नाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असून, आज जवळजवळ एक वर्षापासून या भागातील जाखापूर, कुची व घाटनांद्रे भागास पिण्यास योग्य नसणारे पाणी टॅँकरने पुरविले जाते. त्या पाण्यास वास येतो. त्याचबरोबर वाघोली प्रादेशिक योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापुरात भीषण पाणीटंचाई आहे. चाºयाविना जनावरे दगावत असतानाही त्याचे शासनाला गांभीर्य नाही. गेली दोन वर्षे पिके वाया गेली तरीही त्याची खोटी आणेवारी लावल्याने पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे शासकीय अधिकाºयाने वस्तुस्थितीची जाणीव ठेवून काम करावे व जनतेची चेष्टा थांबवावी, असे कॉँगे्रसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.