लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज तालुक्यातील तुंग येथे सहा आणि आठ अशा दोन अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश प्रकाश कांबळे, यश भास्कर कांबळे अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा आणि आठ वर्षीय अशी दोन मुले मंगळवारी रात्री घराच्या परिसरात खेळत होती. यावेळी संशयित दोघे तेथे आले. त्यांनी दोन अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ केला. यावरच संशियत थांबले नाहीत, तर त्यांनी त्या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले.
या घटनेची मुलांनी पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. यानुसार संशयिताविरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.