शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण; माधवनगरच्या महिलेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST

सांगली : अल्पवयीन मुलाशी सोशल मीडियावरून ओळख वाढवत त्याला नांदेडहून सांगलीत बोलावून घेत त्याचे एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा ...

सांगली : अल्पवयीन मुलाशी सोशल मीडियावरून ओळख वाढवत त्याला नांदेडहून सांगलीत बोलावून घेत त्याचे एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी माधवनगर येथील महिलेविरोधात पीडित मुलाच्या वडिलांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुलै २०१९ मध्ये नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून माधवनगर येथील महिलेची ओळख झाली होती. संबंधित महिला या मुलाशी ओळख वाढवत, त्याला जाळ्यात ओढत माधवनगरला येण्याची वारंवार विनंती करत होती. त्या मुलाने माधवनगरला येण्यास नकार दिल्यानंतर, संशयित महिलेने जीव देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पीडित मुलगा तिला भेटण्यासाठी माधवनगर येथे आला होता. त्यावेळी महिलेने त्याचे जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. त्यानंतरही दोनवेळा असाच प्रकार घडल्यानंतर त्याने याची माहिती स्वत:च्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी मुलाचे वडील माधवनगरला आले, मात्र या महिलेने मुलाच्या वडिलांवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर अधिक माहिती घेत पीडित मुलाच्या वडिलांनी सोमवारी सांगलीत येऊन संजयनगर पोलिसांत या महिलेविरोधात लैंगिक शोेषणाची फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.