शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

शिराळ्यात तीव्र दुष्काळ, तरीही मदत नाही

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

४५ गावे ५० पैसेवारीपेक्षा कमी : शासनाच्या भूमिकेवर शेतकरी नाराज

विकास शहा -- शिराळाशिराळा तालुक्याला पहिल्यांदाच मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. शासनाची नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी झाली. अंतिम पैसेवारीत ४५ गावे ५० पैसेवारीपेक्षा कमी आहेत. मात्र शासनाकडून अद्याप एकही पैशाची मदत या गावांना मिळालेली नाही. शासन येथील शेतकरी आत्महत्या करणार तेव्हाच जागे होणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.या तालुक्यातील वारणा काठ सोडला, तर सर्व गावात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप गेला, रब्बी हंगामही गेला. शासनाने प्रथम दि. १५ सप्टेंबर रोजी नजर पैसेवारी (अंदाजे) केली. ३१ आॅक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी केली. याचबरोबर १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी केली. या पैसेवारीसाठी भात पीक ग्राह्य धरण्यात आले होते. अनेक तालुक्यात नजर पैसेवारी शासनाचा निधी आला आहे. मात्र या तालुक्यातील शिरसी, आंबेवाडी, धामवडे, कोंडाईवाडी, टाकवे, बांबवडे, पाचुंब्री, भैरेवाडी, पणुंंब्रे तर्फ शिराळा, घागरेवाडी, गिरजवडे, शिवारवाडी, निगडी, औंढी, करमाळे, चरण, नाठवडे, मोहरे, आरळा, येसलेवाडी, भाष्टेवाडी, बेरडेवाडी, सोनवडे, मणदूर, गुढे, मानेवाडी, पाचगणी, काळुंद्रे, खराळे, चिंचेवाडी, करुंगली, मराठवाडी, पणुंबे तर्फ शिराळा, कुसळेवाडी, कदमवाडी, किनरेवाडी, कुसाईवाडी, शिंदेवाडी, येळापूूर, गवळेवाडी, मेणी, रांजणवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, हातेगाव या ४५ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. मात्र अद्याप या गावांना एक रुपयाचीही मदत शासनाकडून मिळालेली नाही.शासनाने या गावांना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच आता आणखी अनेक गावात सध्या पीक, पाणी स्थिती भयानक झाली आहे. त्यामुळे या गावांचा पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करित आहेत.राज्यकर्त्यांचा पाठपुरावा कमीशिराळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाबरोबर रब्बी हंगामातील पिकेही वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच पडले नाही, तरीही शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून गावे घोषित केली नाहीत. याकडे तालुक्यातील राज्यकर्त्यांचेही प्रयत्न कमी पडल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.