शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

आष्टा येथील सातजणांना कोठडी

By admin | Updated: December 9, 2014 23:26 IST

व्यापाऱ्यांची फसवणूक : नोंदी, नूतनीकरणाच्या बोगस पावत्या

आष्टा : आष्टा शहरात दुकाने नोंदी व नूतनीकरणाकरिता माऊली फाऊंडेशन इस्लामपूर व शिवाजी पवार दादा शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेकडून बोगस पावत्यांद्वारे व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक व संस्थेच्या पावती पुस्तकावर शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून फसवणूक करणाऱ्या सात आरोपींना आष्टा पोलिसांनी अटक करून इस्लामपूर न्यायालयासमोर उभे केले असता, सातही संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.लोकशासन आंदोलनाचे पश्चिम विभाग उपसंघटक व स्वराज्य माझा प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष शामराव कुंडलिक क्षीरसागर (वय ५९, रा. इस्लामपूर), संदीप शहाजी देसावळे (२६, बहाद्दूरवाडी), संजय पांडुरंग गायकवाड (३८, येलूर), अभिजित पांडुरंग मेढे (रा. अभियंतानगर, इस्लामपूर), राहुल दादाराव डोरले (२७, इस्लामपूर), विजय सर्जेराव मिसाळ (१९, कामेरी), अलोक अशोक रांजवणे (२२, कामेरी) यांनी माऊली फाऊंडेशन व शिवाजी पवार दादा शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दुकान नोंदणी व नूतनीकरणाकरिता बोगस पावती पुस्तके छापली. या पावत्यांवर शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून शहरातील दुकानदारांकडून ५0 रुपये फॉर्म फी घेऊन पावती देऊन व्यापाऱ्यांची लाखोंची फसवणूक करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक आरती बनसोडे म्हणाल्या की, याबाबत न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सर्व आरोपींना पोलीस कोठडी मिळेल अशी आशा होती. मात्र तसे घडले नाही. यापुढे व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. (वार्ताहर)आॅनलाईनसाठीही पैसेशामराव क्षीरसागर याने फौंडेशनच्यावतीने अन्न भेसळबाबत आॅनलाईन पैसे भरण्याकरिता ९५० रुपये घेतले असून, ५०० रुपये शासन फी, २०० रुपये संबंधित कॉम्प्युटर सेंटर चालक व २५० रुपये स्वत:च्या संस्थेकरिता घेतल्याची माहिती समोर येत आहे.