शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांची रोकड संशयितांकडून जप्त

By admin | Updated: April 18, 2016 00:35 IST

पेपरफुटी प्रकरण : अधिकाऱ्यास कोठडी

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेविका पदाच्या पेपर फुटीप्रकरणी अटकेत असलेल्या संजय कांबळे (रा. हरिपूर) व किरण कदम (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांच्याकडून अनुक्रमे तीन व दोन, अशी पाच लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. दरम्यान, अटकेत असलेला राधानगरी (जि. कोल्हापूर) पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी अभिजित पाटील यास रविवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.संजय कांबळे हा कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक आहे, तर किरण कदम हा सांगली जिल्हा परिषदेत कनिष्ठ लिपिक आहे. गेल्या आठवड्यात त्यांना अटक केली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. शनिवारी रात्री उशिरा एकाचवेळी पोलिसांच्या दोन पथकांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. तासभर सुरू असलेल्या घराच्या झडतीत कांबळेच्या घरात दोन लाख, तर कदम याच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली. ही रोकड जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयातील कनिष्ठ बार्इंडर रामदास फुलारे याच्याकडून दोन लाखांची रोकड जप्त केली होती. सहा महिन्यांच्या तपासात दोन ‘डझन’ संशयितांना अटक झाली असली तरी, केवळ सात लाखांची रोकड जप्त झाली आहे. संशयितांनी ही रोकड उमेदवारांकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अटकेतील विस्तार अधिकारी अभिजित पाटील याला रविवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पेपर फुटीच्या साखळीत त्याचा ‘रोल’ काय होता, याची चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कागदपत्रे जाळलीभोसे (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक मंदार मोहन कोरे (रा. हरिपूर) यालाही गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्याच्याही घरावर छापा टाकण्यात आला; पण तत्पूर्वी त्याच्या घरच्यांनी घरामागे काही कागदपत्रे जाळल्याचे निष्पन्न झाले आहे. बऱ्याच वेळानंतर हा प्रकार पथकाच्या लक्षात आला. घराच्या झडतीत काही सापडले नाही; परंतु कोणती कागदपत्रे जाळली, याची चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.