शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात कारखान्यांची धुराडी बंद

By admin | Updated: February 22, 2017 23:23 IST

बेचाळीस लाख टन उसाचे गाळप : पन्नास लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यात ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन साखर कारखान्यांकडून करण्यात आले आहे. उसाचा साखर उतारा सरासरी ११.८२ टक्के आहे. उसाच्या कमतरतेमुळे महांकाली साखर कारखाना, वसंतदादा साखर कारखान्यासह सहा साखर कारखान्यांना हंगाम अर्धवटच उरकता घ्यावा लागला असून त्यांनी धुराडी बंद केली आहेत. उर्वरित कारखान्यांचे हंगामही आठवडाभर चालतील, अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यातील मागीलवर्षी उसाची पुरेशी लागवड झाली नाही. उसाची बिलेही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी अन्य पिकांकडे वळला आहे. चार वर्षापूर्वी कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात येत होता. परंतु, कर्नाटक सीमाभागातही साखर कारखाने उभे राहिल्यामुळे, त्यांनाच तेथे ऊस कमी पडू लागला आहे. यातच यावर्षी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांनीही काट्यावर पैसे देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यातील ऊस पळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरेसा ऊसच उपलब्ध झाला नसल्यामुळे त्यांना निम्म्यातच कारखान्यांचे गळीत हंगाम उरकावे लागले.जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. गळीत हंगामामध्ये क्रांती कारखान्याने आघाडी घेतली असून त्यांनी आतापर्यंत पाच लाख ६९ हजार ८९० टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी सहा लाख ९३ हजार १७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले असून, १२.३१ टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे. राजारामबापू पाटील, साखराळे (ता. वाळवा) या कारखान्याने साडेचार टन उसाचे गाळप करून पाच लाख १५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उतारा सर्वाधिक १२.७५ टक्के मिळविला आहे. यामुळे कारखानदारीबराबेर ऊस उत्पादक ही अडचणीत सापडला आहे. याचा परिणाम साखर उत्पादनाबरोबरच येथील ऊस उत्पादकांवर झाला आहे. यामुळे कारखानदारीवर असणारा शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र सर्वत्र आहे. (प्रतिनिधी)कारखान्यांचा बंद हंगामराजारामबापू साखर कारखान्याच्या ताब्यात असलेल्या जतच्या डफळे कारखान्यास तर दहा दिवसातच गळीत हंगाम बंद करावा लागला. त्यानंतर लगेचच खासदार संजयकाका पाटील यांच्या ताब्यातील नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत कारखान्याचा गळीत हंगामही सातच दिवसात बंद झाला. सांगलीतील वसंतदादा कारखाना महिन्यात, तर महांकाली (कवठेमहांकाळ), निनाईदेवी (दालमिया) कोकरूड, (ता. शिराळा), सद्गुरु श्री श्री शुगर राजेवाडी (ता. आटपाडी) या कारखान्यांना महिना ते दीड महिन्यात गळीत हंगाम उरकावा लागला. उर्वरित साखर कारखान्यांचा गळीत हंगाम फार दिवस चालेल अशी परिस्थिती नाही. येत्या पंधरा दिवसात गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.