शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

सांगली, मिरजेत सात बसेस फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:25 IST

सांगली/मिरज : कोरेगाव-भीमा (जि. पुणे) येथे दोन गटात झालेल्या मारामारीचे पडसाद मंगळवारी सांगली, मिरजेत उमटले. मिरजेत सहा एसटी बसेसवर, तर सांगलीत एका खासगी आराम बसवर दगडफेक झाली. दलित महासंघाने या घटनेचा निषेध करीत सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत ३ जानेवारीच्या बंदला ...

सांगली/मिरज : कोरेगाव-भीमा (जि. पुणे) येथे दोन गटात झालेल्या मारामारीचे पडसाद मंगळवारी सांगली, मिरजेत उमटले. मिरजेत सहा एसटी बसेसवर, तर सांगलीत एका खासगी आराम बसवर दगडफेक झाली. दलित महासंघाने या घटनेचा निषेध करीत सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत ३ जानेवारीच्या बंदला पाठिंबा देऊन बंद शांततेत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी मुख्य बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दोषीवर कडक कारवाई करावी, अन्यथा महाराष्टÑभर आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी दिला. उत्तम कांबळे, सतीश मोहिते यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढविली. शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सायंकाळी शास्त्रीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. दोषीवर शासनाने तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. बुधवारच्या ‘महाराष्टÑ बंद’ला पाठिंबा देऊन हा बंद शांततेत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी अकरा वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी जमून, जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचा निर्णय झाला.बैठकीस नगरसेवक बाळू गोंधळी, किरणराज कांबळे, नितीन कांबळे, सुरेश दुधगावकर, शंकर माने, प्रियानंद कांबळे, प्रा. रवींद्र ढाले, गॅब्रीयल तिवडे, रोहित शिवशरण, अमोल वेटम, असिफ बावा, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील उपस्थित होते.दरम्यान, शसकीय रुग्णालय चौकात दुपारी दोन वाजता कोल्हापूर-मिरज या खासगी आराम बसवर (क्र. एमएच ४८-के-७८७६) अज्ञातांनी दगडफेक करुन काचा फोडल्या. यामध्ये पाच हजाराचे नुकसान झाले. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा रात्री उशिरापर्यंत शहरात फिरुन परिस्थितीचा आढावा घेत होते. सर्व पोलिस ठाण्यांतील तसेच पोलिस मुख्यालयातील गुप्त वार्ता विभागातील पोलिसही शहरात फिरुन परिस्थितीची माहिती घेऊन वरिष्ठांना कळवत होते. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन रात्री उशिरापर्यंत पोलिस मुख्यालयात सुरु होते.मिरजेत सहा बसेसवर दगडफेकसोमवारी मध्यरात्री मिरज बसस्थानकात चार ते पाच अज्ञात तरुणांनी प्रवेश करुन तिथे उभ्या असलेल्या बसेसवर (क्र. एमएच १४ बीटी १०८७, एमएच १४ बीटी १०२१, एमएच ४० ५०७०, एमएच १२ बीटी ९७८) दगडफेक केली. बस स्थानकाबाहेर संतोषवाडी मुक्कामी जाणाºया बसवर (क्र. एमएच १२ ईएफ ६४९६) दगडफेक करुन काचा फोडल्या. याबाबत एसटी नियंत्रक शिवाजी खांडेकर यांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली.या घटनेनंतर बसस्थानक ते शास्त्री चौकदरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही दुपारी चार वाजता उत्तमनगर येथे सांगली-चिंचणी एसटी बसवर (एमएच १४ बीसी ४६१२) मागील बाजूने अज्ञातांनी दगडफेक करुन काचा फोडल्या. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीच्या घटनेनंतरही एसटी वाहतूक सुरळीत होती.अफवा पसरविणाºयांची गय नाही : सुहेल शर्माकोरेगाव-भीमा घटनेसंदर्भात सोशल मीडियावरुन समाजभावना भडकविणाºया पोस्ट टाकण्याचा किंवा अफवा पसरविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी दिला आहे.भिडे गुरुजींचा संबंध नाही : शिवप्रतिष्ठानसांगली : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजींचे नाव जाणीवपूर्वक राजकीय षड्यंत्राचा भाग म्हणून गोवण्यात आले आहे. या प्रकरणाशी गुरुजींचा कोणताही संबंध नाही, असे संस्थेचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.