तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथे वाढत्या कोरोनो रुग्णांची संख्या लक्षात घेऊन गाव कारोनोमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे कोरोनो विलगीकरण कक्षाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील यांच्या प्रयत्नातून या कक्षाची सुरुवात झाली.
येळावीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. गृहविलगीकरणात काळजी न घेतली गेल्याने रुग्णसंख्या वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी अमित पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीतर्फे विलगीकरण कक्षाची सुरुवात करण्यात आली. येळावी जिल्हा परिषद शाळेत या कक्षाची सुरुवात गटविकास अधिकारी बापट यांच्या हस्ते उद्घाटन करून झाली. यावेळी अमित पाटील, अनिल पाटील, उपसरपंच रवी सूर्यवंशी, वैभव पाटील, मौला शिकलगार, अनिल जाधव, दशरथ गावडे, जयदेव भंडारे, ग्रामसेवक किरण जाधव उपस्थित होते.