देवराष्ट्रे : ताकारी व म्हैसाळ योजनेच्या बांधकाम व प्रशासन विभागाकडे आतापर्यंत सिंचन व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी होती. यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत होता. ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे योग्य सर्वेक्षण होत नव्हते. याचा फटका योजनांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास बसत होता. याबाबत व्यवस्थापनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याचा अध्यादेश काढला आहे. ही कार्यवाही आजपासूनच (बुधवारी) सुरू होणार आहे, अशी माहिती ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत चालली असल्याने सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज भेडसावत होती. किंबहुना योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी या विभागाची योजनांना सक्त गरज निर्माण झाली होती. ताकारी योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार हेक्टर आहे. त्यामुळे अपुरी कामे, नवीन कामे, पाणी सुरू-बंद करणे, मोजणी करणे, आकारणी करणे आणि वसुली यासारख्या सर्व कामांचा अतिरिक्त बोजा बांधकाम व प्रशासन विभागावर पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे व शेतकऱ्यांना सोयी देणे कठीण बनले होते. याचा आर्थिक भुर्दंड योजनेला सहन करावा लागत होता. त्यामुळे ही योजना दिवसेंदिवस तोट्यातच चालली होती.सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र व्हावा, यासाठी प्रशासनाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तसा याबाबत राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने म्हैसाळ योजनेच्या विभाग क्र. १ चे ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग असे नामांतर केले आहे. या मुख्य विभागांतर्गत ताकारी योजनेच्या दोन उपशाखा काम करणार आहेत. त्यापैकी एक शाखा वांगी (ता. कडेगाव) येथे, तर देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील दुसरी शाखा तासगाव येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दोन्ही शाखांना ताकारीच्या एकूण लाभक्षेत्रापैकी कमी-अधिक प्रमाणात क्षेत्राची विभागणी करून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)‘ताकारी-म्हैसाळ’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभागशासनाचा अध्यादेश : बुधवारपासून कार्यवाही सुरू होणारदेवराष्ट्रे : ताकारी व म्हैसाळ योजनेच्या बांधकाम व प्रशासन विभागाकडे आतापर्यंत सिंचन व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी होती. यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत होता. ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे योग्य सर्वेक्षण होत नव्हते. याचा फटका योजनांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास बसत होता. याबाबत व्यवस्थापनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याचा अध्यादेश काढला आहे. ही कार्यवाही आजपासूनच (बुधवारी) सुरू होणार आहे, अशी माहिती ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत चालली असल्याने सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज भेडसावत होती. किंबहुना योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी या विभागाची योजनांना सक्त गरज निर्माण झाली होती. ताकारी योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार हेक्टर आहे. त्यामुळे अपुरी कामे, नवीन कामे, पाणी सुरू-बंद करणे, मोजणी करणे, आकारणी करणे आणि वसुली यासारख्या सर्व कामांचा अतिरिक्त बोजा बांधकाम व प्रशासन विभागावर पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे व शेतकऱ्यांना सोयी देणे कठीण बनले होते. याचा आर्थिक भुर्दंड योजनेला सहन करावा लागत होता. त्यामुळे ही योजना दिवसेंदिवस तोट्यातच चालली होती.सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र व्हावा, यासाठी प्रशासनाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तसा याबाबत राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने म्हैसाळ योजनेच्या विभाग क्र. १ चे ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग असे नामांतर केले आहे. या मुख्य विभागांतर्गत ताकारी योजनेच्या दोन उपशाखा काम करणार आहेत. त्यापैकी एक शाखा वांगी (ता. कडेगाव) येथे, तर देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील दुसरी शाखा तासगाव येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दोन्ही शाखांना ताकारीच्या एकूण लाभक्षेत्रापैकी कमी-अधिक प्रमाणात क्षेत्राची विभागणी करून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)प्रत्येक उपशाखेच्या अंतर्गत प्रत्येकी चार शाखा काम पाहणार आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना पाण्यासह ओलिताखालील क्षेत्राच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण झाला आहे. या विभागाच्या माध्यमातून योजनेचे आवर्तन सुरू करणे, शेतकऱ्यांचे मागणी अर्ज जमा करणे, मोजणी करणे, आकारणी करणे, वसुली करणे ही सर्व कामे करावयाची आहेत.
‘ताकारी-म्हैसाळ’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग
By admin | Updated: April 1, 2015 00:02 IST