संख : विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबरच समाजाप्रती संवेदनशील भावना व्यक्त करणारे व माणूस म्हणून घडविणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. कठोर परिश्रम, ध्येयाप्रतीचा ध्यास व सकारात्मक दृष्टिकोन हे यशाची त्रिसूत्री आहे, असे मत आसंगी तुर्क केंद्राचे केंद्र प्रमुख रामेश राठोड यांनी व्यक्त केले.
करेनहट्टी (ता. जत) येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत आसंगीतुर्क केंद्राच्यावतीने शिक्षक समितीचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक व आदर्श केंद्र पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाप्पा माळी अध्यक्षस्थानी होते.
शिवगेनी नरळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कन्नड हायस्कूलचे मुख्याध्यापक माळी, शंकर शिंगाडे, शशिकांत सावंत, फुलसिंग राठोड, मल्लिकार्जुन माळी, करेनहट्टीचे मुख्याध्यापक रमेश राठोड उपस्थित होते. अभिजीत माळगोंडे यांनी सूत्रसंचालन केले. खंंडू घोडे यांनी आभार मानले.