शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

सांगली जिल्ह्यातील प्रस्ताव पाठवा, मंत्रालयात लगेच मंजुरी

By admin | Updated: September 11, 2015 23:38 IST

विजयकुमार : सांगलीतील टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; हयगय करणाऱ्यावर कारवाई

सांगली : जिल्ह्याचा जलयुक्त शिवार व अन्य विकास कामांचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून शासनाकडे त्वरित पाठवा. शासनस्तरावर लागणारे सर्व परवाने मिळविण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. परंतु, प्रस्ताव पाठविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्राचे वित्त विभागाचे प्रधान सचिव व सांगली जिल्ह्याचे पालक सचिव विजयकुमार यांनी शुक्रवारी दिला.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक शुक्रवारी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे आदी उपस्थित होते. विजयकुमार म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून तो शासनदरबारी सादर करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनस्तरावर सादर करावी. शासनस्तरावर लागणारे सर्व परवाने मिळविण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील राहीन. जलयुक्त शिवार निर्धारित वेळेत पूर्ण करुन नवीन कामांचा आराखडा तयार करावा. अग्रणी नदी पुनरुज्जीवन, नालाबंडींगची कामे वेळेत पूर्ण करण्यावर यंत्रणांनी भर द्यावा. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आॅनलाईनच जमा करा सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी त्वरित जोडण्याची कार्यवाही करावी, त्याचबरोबर प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, अटल पेन्शन योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, असे सांगून त्यांनी जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्याचा आढावा घेतला.