शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

वितरकांसह विक्रेत्यांची चौकशी होणार

By admin | Updated: December 25, 2014 00:10 IST

खत विक्री घोटाळा : कृषी सहसंचालकांना अहवाल देणार : आर. जी. भोसले

सांगली : खत घोटाळा प्रकरणातील वस्तुस्थिती समोर यावी आणि यामधील दोषी व्यक्तींची नावे निष्पन्न व्हावीत, यासाठी मुख्य वितरकासह जिल्ह्यातील विक्रेत्यांची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आर. जी. भोसले यांनी दिली. या प्रकरणाने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. चौकशीअंती स्वतंत्रपणे अहवाल तयार करण्यात येणार असून तो कृषी सहसंचालकांकडे सादर केला जाईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. जिल्ह्यात ६,१८७ मेट्रिक टन सुपर फॉस्फेट खताचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु ते खत विक्रेत्यांमार्फत किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबईतील एका अधिकृत खत उत्पादक कंपनीने बोगस बिलांद्वारे खताचे कोट्यवधीचे अनुदान लाटल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यामुळे प्रशासनाने संख (ता. जत), वासुंबे, कुमठे, तासगाव व कसबे डिग्रज आदी ठिकाणच्या विक्रेत्यांकडे तपासणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी डी. ए. शिंगे, डी. एम. पाटील आदींच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तपासणी सुरु केली आहे. खताचा कागदोपत्री पुरवठा दाखवून बोगस अनुदान लाटल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील सहा वितरक आणि आठ विके्रत्यांचे दफ्तर ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी प्रशासनाने संंख (ता. जत) येथील वीस टन खताची तपासणी केली असून विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची ५० जणांची यादी घेण्यात आली आहे. कसबे डिग्रज येथील तीस पोती खताची, तर वासुंबे येथील ५० पोती खताची तपासणी करण्यात आली. तासगावमधील तीन दुकानांची तपासणी पथकाने चौकशी केली आहे. पुढील दिवसात याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. खत वितरकांमार्फत जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांपर्यंत पोहोचले आहे. तेथून ते शेतकऱ्यांनी नेल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी खत नेले आहे, त्यांच्याकडे खात्री पटविण्याचे काम प्रशासन करणार आहे. याकरिता विक्रेत्यांकडे असणाऱ्या पावत्यांची तपासणी होणार आहे. पावत्यांवर ज्या शेतकऱ्यांची नावे असतील, त्यापैकी काहींकडे जाऊन त्यांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)खत घोटाळ्याच्या चौकशीची मागणी खत खरेदीसाठी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा गैरवापर केल्याप्र्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांनी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांना बुधवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले. कृषी विभागाशी संगनमत करून संबंधित खत कंपन्या मालामाल होत आहेत. या सर्वच प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही तांबोळी यांनी दिला आहे.