शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

कालबाह्य खताची नव्या पोत्यातून विक्री

By admin | Updated: June 21, 2014 00:22 IST

कुपवाड एमआयडीसीतील प्रकार : इस्लामपूरला खताचा पुरवठा; कृषी विभागाकडून तपासणी

सांगली : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामामधील कालबाह्य खत नवीन पोत्यात भरून ते विक्रीसाठी पाठविले जात आहे. खतामधील ही बोगसगिरी पाहणाऱ्या एका वाहनचालकाने ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला दूरध्वनीवरून ही माहिती दिली. त्यानंतर चौकशी केली असता तेथे असा प्रकार घडत असल्याचे आढळून आले आहे. येथील खत अनेक विक्रेत्यांकडे गेले असून दोन ट्रक खत इस्लामपूर शहरात पाठविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खतामधील बनवेगिरीमुळे मुख्य विक्रेते मालामाल, तर शेतकरी कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. शेतीची मशागत, मजुरी आणि खते, बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वाढल्याने तो कर्जबाजारी झाला आहे. यातूनही अनेक प्रयोगशील शेतकरी मार्ग काढून चांगले उत्पन्न घेत आहेत. परंतु, बोगस बियाणे, खतांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कृषी विभाग यावर कडक कारवाई करू शकत नसल्यामुळे दिवसेंदिवस खताची बोगसगिरी वाढू लागली आहे. सांगली शहराजवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये असाच प्रकार घडत आहे. येथे कालबाह्य खत नवीन पोत्यात भरून विक्री होत आहे. एका मुख्य खत वितरकाने २०१० मधील कालबाह्य शिल्लक खत सध्या नवीन पोत्यात भरून कंपनीचा हुबेहूब शिक्का मारून विकण्यास सुरुवात केली आहे. जुन्या खताची पोती फोडून ते खत एकत्र करून नवीन पोत्यात भरून त्याची विक्री होत आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक एका वाहनचालकाने पाहिली. त्यानंतर त्याने ‘लोकमत’कडे दूरध्वनीवरून या बोगसगिरीबद्दलची हकिकत सांगितली. संबंधित प्रकाराची चौकशी केल्यानंतर खतामधील बोगसगिरी होत असल्याचे अन्य वाहनचालकांनीही सांगितले. गोदामात आनोळखी व्यक्तीला आतमध्ये सोडले जात नसल्याचे चालकांनी सांगीतले. तेथून भरून आलेल्या दुसऱ्या ट्रकचालकाला, कोणता माल असल्याचे विचारले असता, त्याने खत असून ते इस्लामपूरला घेऊन जात असल्याचे सांगितले. कोणत्या कंपनीचे आहे, असे विचारले असता, त्याने स्मितहास्य करीत बोलण्यास नकारा दिला आणि ट्रक पुढे घेऊन गेला. खत, बियाणे बोगसगिरी होऊ नये म्हणून कृषी विभागाने ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु, यापैकी एकाही पथकाचे कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या खताच्या बोगसगिरीकडे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, कृषी विकास अधिकाऱ्यांना कुपवाडला रात्री भेट देऊन शोध सुरु केला आहे. (प्रतिनिधी)