शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून स्वार्थी राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:11 IST

जत : मागील साडेतीन वर्षात पालकमंत्री जत येथे आले नाहीत. परंतु नगरपालिका निवडणूक सुरु झाल्यानंतर आठ दिवसात दोन वेळा ते येथे आले आहेत. स्वार्थी हेतू ठेवून केवळ राजकारण करण्यासाठी ते येत आहेत. शहरातील सूज्ञ मतदारांनी त्यांचा हेतू ओळखून मतदान करावे, असे आवाहन प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.जत ...

जत : मागील साडेतीन वर्षात पालकमंत्री जत येथे आले नाहीत. परंतु नगरपालिका निवडणूक सुरु झाल्यानंतर आठ दिवसात दोन वेळा ते येथे आले आहेत. स्वार्थी हेतू ठेवून केवळ राजकारण करण्यासाठी ते येत आहेत. शहरातील सूज्ञ मतदारांनी त्यांचा हेतू ओळखून मतदान करावे, असे आवाहन प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.जत नगरपालिका निवडणूक प्रचारार्थ थोरली वेस जत येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जत तालुक्यात मागील उन्हाळ्यात ८२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु असताना पालकमंत्र्यांनी येऊन आढावा बैठक घेतली नाही. जत नगरपालिकेचे बजेट ५२ कोटी रुपये इतके आहे. परंतु उत्पन्न कमी आहे. येथील विकास कामासाठी आ. मोहनराव कदम यांचा विधानपरिषद निधी वापरुन विकास पूर्ण करु अशी ग्वाही देऊन विश्वजित कदम पुढे म्हणाले की, जत नगरपालिकेचा विकास होऊ नये म्हणून विरोधकांनी येथे काही ठेकेदार कार्यकर्ते जाणीवपूर्वक निर्माण केले. त्यांनी कमी किंमतीची निविदा भरुन इतरांना काम करु दिले नाही असेही त्यांनी सांगितले.सुरेश शिंदे यांची आम्ही काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करणार होते ते स्वत:हून इतरत्र गेले ते चांगलेच झाले आहे. आता जत तालुका कमिटी काँग्रेस स्वच्छ झाला आहे, असे त्यांनी सांगितले.विक्रम सावंत म्हणाले की, मागील पाच वर्षात आमच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विकास करता आला नाही. आता बहुमत दिल्यास निश्चित विकास करु अशी ग्वाही त्यांनी दिली.नगराध्यक्ष इकबाल गवंडी म्हणाले, आम्ही भ्रष्टाचार केला असता तर जनतेने त्याचवेळी आम्हाला बाजूला केले असते. सुरेश शिंदे यांनी बुलडोझर लावून जत शहराला लुटले आहे, असा आरोप त्यांनी केला. सुरुवातीस आप्पू बिराजदार यांनी स्वागत केले. यानंतर सुजय शिंदे, मोहन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बाबासाहेब कोडग, शुभांगी बन्नेनवार, परशुराम मोरे, महादेव कोळी, अ‍ॅड. युवराज निकम, रवींद्र सावंत, मनीषा साळे, मंदाकिनी बेळंखी, नंदा व्हनमाने आदी उपस्थित होते. इराण्णा निडोणी यांनी आभार माानले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण