शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

स्वाभिमानी, निर्भीड नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

आपल्या राजकीय आयुष्यात साहेबांनी पराभवाची तमा न बाळगता कायम पुढे चालत राहणे, त्याचबरोबर संघर्षामुळे परिणामांची चिंता कधी केली नाही. ...

आपल्या राजकीय आयुष्यात साहेबांनी पराभवाची तमा न बाळगता कायम पुढे चालत राहणे, त्याचबरोबर संघर्षामुळे परिणामांची चिंता कधी केली नाही. आपल्या स्वार्थापोटी नेत्यापुढे लाळघोटेपणा कधी केला नाही. हाच विचार त्यांनी आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांत रुजविला. म्हणूनच, त्यांचे कट्टर कार्यकर्ते साहेब हाच आमचा पक्ष असल्याचे ठासून सांगतात. त्यामुळे साहेबांच्या आतापर्यंतच्या राजकीय कालखंडात त्यांच्या गटात कित्येक कार्यकर्ते आले, कित्येक गेले त्याची तमा साहेबांनी कधी बाळगली नाही. जगताप साहेब यांचा स्वभाव मुळातच रोखठोक व स्पष्टवक्तेपणा असा असून वारकरी सांप्रदायाचा वारसा त्यांना लाभलेला अशी त्यांची राजकीय पार्श्वभूमी. अन्यायाविरुध्द लढण्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे साहेबांचे व्यक्तिमत्त्व तर आहेच शिवाय भोंदुगिरी, अंधश्रद्धेच्या विरुध्द त्यांनी कायम स्वतःची अशी वेगळी भूमिका अनेक सभांतून मांडली.

‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हानू काठी’

या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार स्वभाव असल्याने अन्यायाने वागणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात कायम भूमिका घेतली. त्यामुळेच साहेबांनी स्वतःची अशी ठाम भूमिका मांडत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने शासनाशी वेळोवेळी संघर्ष करत अनेक विकासाचे मुद्दे मांडले. मागासलेल्या दुष्काळी तालुक्यातील दबलेल्या जनतेमध्ये सातत्याने जनजागृती जगताप साहेबांनी केली. तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज यासाठी संघर्ष तर सातत्याने केलाच, शिवाय १९८८ साली पहिला ऐतिहासिक मोर्चा काढला. त्या मोर्चाला ३७/३ कलम जारी केले गेले. त्याचबरोबर राजकीय वाटचालीत आजतागायत ३ वेळा पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले. शिवाय आमदारकीच्या कालावधीमध्ये तालुक्यातील अनेक रस्त्यांची दर्जोन्नती केली आहे. तालुक्यातील सर्व गावे डांबरी रस्त्याने जोडली. कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमा भागातील अनेक रस्ते डांबरीकरण करून जोडले गेले. तर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी तालुक्यात जलसंधारणाला गती देत पूर्व भागातील बोर नदीवर १२ बंधारे बांधले. तर सिंगनहळ्ळी ओढ्यावर ५ बंधारे मंजूर केले. अशा पद्धतीने शेतीच्या पाण्यासाठी सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे उभे केले. एवढेच नाही, तर म्हैसाळ योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याने आज तालुक्यातील अनेक भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना विस्तारित म्हैसाळ योजनाच फायदेशीर असून या योजनेस अंतिम मंजुरी मिळणे व योजना पूर्ण करणे हे साहेबांचे स्वप्न आहे. शिवाय, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी ३३/११ ची वीज उपकेंद्र ५ ठिकाणी मंजूर केली. यामध्ये वाळेखिंडी, बसर्गी, उटगी, अंकले या गावांचा समावेश आहे.

साहेबांच्या राजकीय वाटचालीत त्यांना तालुक्यातील अनेक नेत्यांबरोबर संघर्ष करावा लागला. वयाच्या ७२ व्या वर्षीही त्यांचे राजकारण व समाजकारण अविरतपणे सुरू असून दुष्काळग्रस्त जनतेचे ते मोठे आशास्थान आहेत.

शब्दांकन : भागवत काटकर