शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

शाळेत स्वखर्चाने प्रयोगशाळा अनोखी धडपड : मिरजेतील शिक्षकाचा उपक्रम

By admin | Updated: September 5, 2014 00:09 IST

विज्ञान प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊन विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान या विषयात रुची वाढली

मिरज : मिरजेतील बसवेश्वर कन्नड शाळा क्र. १८ येथील उपक्रमशील व आदर्श शिक्षक संतोषकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व गणिताची माहिती देण्यासाठी शाळेत स्वखर्चाने प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. संतोषकुमार पाटील यांच्या गणित, विज्ञान प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊन विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान या विषयात रुची वाढली आहे.शिक्षक संतोषकुमार पाटील महापालिका शाळेत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रयोगशाळा निर्माण करुन प्रत्यक्ष प्रयोगाची माहिती उपकरणांच्या सहाय्याने विविध प्रयोगांद्वारे समजावून देत आहेत. संतोषकुमार पाटील यांनी स्वखर्चाने प्रयोगशाळेची निर्मिती करुन गेली आठ वर्षे विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा विविध वस्तूंची प्रयोगशाळेत भर टाकली आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील स्थानिक किंमत, अपूर्णांक, वस्तुमान, सर्व भौमितिक आकृत्या, सर्व वैज्ञानिक यांची माहिती छायाचित्रांसह व साहित्यासह करुन दिली जाते. चौथी ते सातवीतील विद्यार्थ्यांना भूगोल विषय प्रत्यक्ष नकाशे, ऋतूंची माहिती, सर्व प्राणी-पक्षी यांची माहिती विविध प्रतिकृतींसह ते करुन देतात. महापालिका शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी संतोषकुमार पाटील यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. दोन वर्षापूर्वी राज्यस्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड स्पर्धेत त्यांची राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे निवड झाली होती. संतोष पाटील यांना त्यांच्या उपक्रमशीलतेबद्दल ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेत गणित व विज्ञान प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. ए. पवार, शाळेचे मुख्याध्यापक रशीद टपाल व सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)