राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदांच्या निवडी शनिवारी कवठेमहांकाळ व तासगाव येथे पार पडल्या. कवठेमहांकाळ येथील बैठकीत युवक राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी मोहन खोत यांची निवड करण्यात आली. येथील बाजार समितीच्या सभागृहात आमदार सुमनताई पाटील, अनिताताई सगरे यांच्याहस्ते निवडीचे पत्र खोत यांना देण्यात आले. निवडीनंतर आमदार पाटील व सगरे यांच्या हस्ते खोत यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यात युवकांचे संघटन करून राष्ट्रवादी पक्ष मजबूत करू, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष मोहन खोत यांनी यावेळी दिली.
तासगाव येथील बैठकीत कवठेमहांकाळ येथील संजय कोळी यांची ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र देऊन कोळी यांचा सत्कार करण्यात आला. ओबीसी घटकातील कार्यकर्त्याचे संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी कोळी यांनी सांगितले. कार्यक्रमास दत्ताजीराव पाटील, एम. के. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, कार्याध्यक्ष महेश पवार, महेश पाटील, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, सुरेखाताई कोळेकर, नूतन वाघमारे, गणेश पाटील, अमर शिंदे, बबूताई वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फाेटाे : १२ माेहन खाेत
फाेटाे : १२ संजय काेळी