लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुका परीट समाज मंडळाच्या अध्यक्षपदी रवींद्र यादव यांची निवड करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष अशोक शिंदे यांनी निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाष दळवी, जिल्हा सदस्यपदी सत्यजित यादव, तालुका सचिवपदी गणेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले की, शिराळासारख्या भागात रवींद्र यादव यांनी मागील वर्षी तालुक्यातील, जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील समाजबांधवांना मोफत उद्योग आधार नोंदणी व कोरोनाकाळात समाजातील गरजूंना मिळवून दिलेली आर्थिक मदत, तसेच शिराळा शहरातील परीट व्यावसायिकांना नगरपंचायतीकडून दहा हजार रुपये अनुदानित कर्ज स्वरूपात मिळवून दिले, तसेच नोंदणीकृत व्यावसायिकांना कोरोनाकाळात पंधराशे रुपये मिळवून दिले. समाजबांधवांसाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंखे, सुभाष दळवी, विजय खेडकर, रोहन परीट, संजय परीट, महादेव परीट, जयसिंग परीट उपस्थित होते.