इस्लामपूर : राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील विविध शाखांमध्ये शिकत असणाऱ्या अंतिम वर्षातील १२ विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखतीमधून निवड झाली. या प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
निवड प्रक्रियेच्या प्रथम फेरीमधून महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. अंतिम मुलाखतीमधून एकूण १२ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांना ४.५१ लाखांचे आणि २ विद्यार्थ्यांना ६.४१ लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश पोवार, प्रा. मोहसीन मुल्ला यांनी पूर्ण निवड प्रक्रिया हाताळली.
या विद्यार्थ्यांना संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, सचिव प्रा. आर. डी. सावंत, विभाग प्रमुख डॉ. नागराज धारवाडकर, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. ए. पी. शहा यांचे मार्गदर्शन लाभले.