शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-पुणे मार्गावर रात्रीच्या रेल्वेगाड्यांना सुरक्षा दलाचा बंदोबस्त, तीन एक्स्प्रेस लुटण्याच्या घटनेमुळे यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 21:42 IST

मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील सालपा व आदर्की स्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे रात्री धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील सालपा व आदर्की स्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे रात्री धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सालपा रेल्वे स्थानकाजवळील सिग्नलची वायर कापून, कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस व सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्या रोखून चोरट्यांनी प्रवाशांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून महिला प्रवाशांचे दागिने हिसकावले. एक्स्प्रेसमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र दरोडेखोरांनी अंधारात शेतीतून पलायन केले.

महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व एलटीटी हुबळी एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न केल्याने रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांची स्वतंत्र तपास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस उपअधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली. शेणोली ते लोणंद स्थानकादरम्यान रात्री धावणाºया सर्व एक्स्प्रेस गाड्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षित कमांडोंचा बंदोबस्त देण्यात आला आहे. लूटमारीबाबत प्रवाशांनी तक्रार केली नाही. मात्र सिग्नल यंत्रणेत बिघाड करणाºया अज्ञातांविरूध्द सातारा रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा दाखल केला आहे. सातारा व मिरज रेल्वे सुरक्षा दल, मिरज रेल्वे पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.