शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:18 IST

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जत, आटपाडी वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्यादिवशी बुधवारी पावसाची संततधार सुरू होती. शिराळा व इस्लामपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील चांदोली धरणातील पाणीसाठा आता ६३ टक्क्यांवर गेला आहे. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे शेतीमधील कामांना गती मिळाली आहे. मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस बुधवारीही कायम होता. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सांगली, मिरजेला या पावसाने चिंब भिजविले असून, शहराच्या सखल भागात पाणी साचून राहिले आहे. गुंठेवारी भागातील नागरिकांना दोन दिवसांच्या पावसाने पुन्हा दलदलीचा सामना करावा लागत आहे. सांगलीतील शामरावनगर, शंभरफुटी रस्त्यावरील उपनगर, जुना धामणी रस्ता, शिवोदयनगर आदी भागात दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेने उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शहरांमधील रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे संपूर्ण शहरभर रस्त्यांवर, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. पाणी निचऱ्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेने केलेली नाही. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदलेल्या आकडेवारीनुसार शिराळा तालुक्यात ४५ मिलिमीटर, वाळवा तालुक्यात ३०, पलूसमध्ये ८, तासगावमध्ये १२, सांगलीत ९, मिरजेत १६, विट्यात १४, कवठेमहांकाळला ४.३, तर कडेगावमध्ये २१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यानंतरही दिवसभर या तालुक्यांमध्ये पाऊस सुरू होता.जत आणि आटपाडी या दुष्काळी तालुक्यांमध्ये ढगांची दाटी असली तरी, पावसाचा केवळ शिडकावाच होत आहे. याठिकाणी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच या दोन्ही तालुक्यात मोठा पाऊस झाला होता. एकूण पावसाच्या आकडेवारीत जत अजूनही आघाडीवर आहे. याठिकाणी एकूण २५५ मिलिमीटर, तर आटपाडीत १६६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.