शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात सत्ताधाऱ्यांनी जागा हडपल्या

By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST

मोहनराव कदम : शहर काँग्रेसचा मेळावा; प्रश्न ताकदीने मांडण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

इस्लामपूर : काँग्रेसची संस्कृती जनतेच्या हिताची आहे. कार्यकर्त्यांनी कोणाच्याही जागा हडप केलेल्या नाहीत, कोणालाही लुबाडलेले नाही, असा टोला नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना मारताना जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यशापयशाची चिंता न करता ताकदीने लढावे, असे आवाहन गुरुवारी केले.येथे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानावरून मोहनराव कदम बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, सरचिटणीस सौ. मालन मोहिते, ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, पक्ष प्रभारी प्रकाशराव सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.कदम म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांची पाटी कोरी आहे. त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाही. त्यामुळे मतदार निश्चितपणे पाठिंबा देतील. शहराचे, जनतेचे प्रश्न ताकदीने मांडा, जनतेसोबत राहा. त्यातून यश मिळेल. नगरपालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.सदाशिवराव पाटील म्हणाले की, इस्लामपूर शहर सधन परिसर असल्यामुळे प्रत्येकजण नेता होण्याच्या मानसिकतेत आहे. निवडणूक लढविण्याच्या पध्दती वेगळ्या असतात. विरोधकांमधील फूट सत्ताधाऱ्यांसाठी शक्तिस्थळ ठरते. त्यामुळे एकसंध राहा. पक्ष आणि उमेदवार अशा दोन्ही पातळीवर मतदार विचार करतो. त्यामुळे निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जायला हवे.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील कार्यकर्ते सहकार्य करतील. काँग्रेसच्या वरिष्ठांनी उमेदवारांना बळ द्यावे. सत्ताधाऱ्यांनी सामान्यांवर आरक्षणे टाकून त्यांना दहशतीखाली ठेवले आहे. राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे.पक्ष प्रभारी प्रकाशराव सातपुते म्हणाले की, पक्षाची संघटना भक्कम करुन निवडणुकीला सामोरे जाऊ. जिल्ह्यातील सर्व नेते येऊन उमेदवारांना बळ देतील. कार्यकर्त्यांनी एकसंधपणे कामाला लागावे.शहराध्यक्ष अ‍ॅड. आर. आर. पाटील यांनी स्वागत, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक, धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील, अजित ढोले, विजय पवार, दादासाहेब पाटील, अमित पाटील, विशाल शिंदे, राजेंद्र वलांडकर, संजय शिंदे, दिलीप जाधव, प्रमोद शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)सदाभाऊंच्या कानपिचक्यानगरपालिकेतील सत्ताकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. केवळ १८५ कार्यकर्ते उपस्थित असल्याचे सांगत, बरे वाटले, असेही ते म्हणाले. येथील राष्ट्रवादीची भक्कम व्यवस्था माहीत असल्याने, सत्ता मिळवू, या भ्रमात राहू नका, असाही सल्ला त्यांनी दिला. जे सत्य आहे ते स्वीकारा, सत्याला सामोरे जा. हत्तीबरोबर दांडू खेळायचा आहे, रक्तबंबाळ झाला तरी निवडणूक लढवायची आहे, हे लक्षात घ्या. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. पण वस्तुस्थिती माहीत असली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी खडे बोल सुनावले.