शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

विट्यात दिग्गजांकडून सुरक्षित प्रभागाचा शोध

By admin | Updated: July 3, 2016 00:18 IST

नगरपरिषद निवडणूक : मातब्बरांच्या दांड्या गुल : चोवीस जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

 विटा : विटा नगरपरिषदेच्या १२ प्रभागांतील २४ जागांसाठीची आरक्षण सोडत शनिवारी नगरपरिषदेच्या अल्पबचत सभागृहात प्रांताधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना हक्काचा प्रभाग गमवावा लागला असल्याने, त्यांना नवीन व सोयीचा प्रभाग शोधावा लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील व विरोधी शिवसेनेचे अमोल बाबर हे दोन ‘दादा’ आणि विद्यमान उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव व माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील या मातब्बरांच्या हक्काच्या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या दांड्या गुल झाल्याने, त्यांना सोयीच्या व सुरक्षित प्रभागाचे सुरक्षा कवच अंगावर घ्यावे लागणार आहे. या आरक्षण सोडतीत अशोकराव गायकवाड, विनोद गुळवणी, किरण तारळेकर मात्र बचावले आहेत. विटा नगरपरिषदेची नवीन द्विसदस्यीय प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. एकूण १२ प्रभागांतील २४ जागांपैकी १२ जागा महिलांना आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी २, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ३ जागांवर सोडत काढण्यात आली. नगरपरिषद शाळा क्र. २ मधील लहान मुलांच्याहस्ते चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत काढऱ्यात आली. २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून द्विसदस्यीय १२ प्रभाग करण्यात आले आहेत. प्रारंभी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नवीन प्रभाग रचना व हद्दीविषयी माहिती दिली. त्यानंतर महिलांसाठी राखीव असलेल्या जागा आणि आरक्षण सोडतीची प्रक्रिया समजावून सांगितली. या आरक्षण सोडतीवेळी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष सचिन जाधव, नगरसेवक किरण तारळेकर, विशाल पाटील, अ‍ॅड. अजित गायकवाड, सुमित गायकवाड, उत्तम चोथे, पद्मसिंह पाटील, अमर शितोळे, सुखदेव पाटील, गंगाधर लकडे, शिवाजी शिंदे, अविनाश चोथे, सचिन शितोळे, मच्छिंद्र कदम, नितीन दिवटे, विलास कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) प्रभागनिहाय : आरक्षण सोडत... प्रभागनिहाय : आरक्षण सोडत... प्रभाग क्र. १ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. २ - अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ३ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ४ - अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ५ - अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ६ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ७ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ८ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ९ - अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. १० - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ११ - अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. १२ - अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण पुरूष, असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. फटाके अन् ‘वाजले की बारा...’ विटा नगरपरिषदेच्या प्रभाग आरक्षण सोडतीस सुरूवात झाल्यानंतर श्वास रोखून धरलेल्या अनेक इच्छुकांच्या दांड्या अनपेक्षितपणे धडाधड उडाल्या. दुपारी १२ वाजता आरक्षण सोडत पूर्ण झाली आणि पालिकेच्या इमारतीवरील १२ चा भोंगा वाजला. त्यावेळी उपस्थित असलेले नागरिक सभागृहाबाहेर पडताना आरक्षण सोडतीत दिग्गजांचे ‘वाजले की बारा’ म्हणत दुसऱ्या मजल्यावरून रस्त्यावर आले. त्यावेळी एकाने रस्त्यावर अचानकच फटाके फोडून त्याने गर्दीतून मार्ग काढत घर गाठले. त्यामुळे नागरिकांना फटाके कशाचे, कशासाठी, कोणी अन् किस खुशी में फोडले? असा प्रश्न पडला. गंडांतराची शक्यता... विटा नगरपरिषदेची प्रभाग रचना फोडल्यामुळे काही विद्यमान नगरसेवकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे काहींना प्रभाग बदलावा लागणार आहे. सर्व प्रभागात काही भाग अनपेक्षितपणे आल्याने उमेदवारांची यावेळी चांगलीच कसोटी लागणार आहे. प्रभाग रचनेतील बदल, द्विसदस्यीय प्रभाग आणि आरक्षणाचा बसलेला फटका यामुळे काही विद्यमान नगरसेवकांसह, गेल्या वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप प्रभाग हद्दीबाबत संभ्रमावस्था असल्याने प्रभागांच्या हद्दीचा अभ्यास करून निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेण्याची भूमिका काही इच्छुकांनी घेतली आहे. ४गेल्या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील व आ. अनिल बाबर यांचे चिरंजीव अमोल बाबर यांच्यात प्रभाग क्र. १ मध्ये चुरशीचा सामना झाला. मात्र यावेळी या दोघांच्याही हक्काच्या समजल्या जाणाऱ्या या प्रभागात दोन्ही जागांवर आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. तसेच उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव, नगरसेवक नंदकुमार पाटील, सुभाष पाटील या विद्यमानांनाही नवीन प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे. माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांच्या प्रभाग क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती पुरूष आरक्षण आल्याने हा प्रभाग त्यांच्यासाठी सोयीचा झाल्याने, त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सत्ताधारी गटातून पद्मसिंह पाटील, जगन्नाथ पाटील, विरोधी गटातून रामचंद्र भिंगारदेवे, शेखर भिंगारदेवे, अ‍ॅड. अजित गायकवाड, सुमित गायकवाड, शिवसेनेचे शिवाजी शिंदे, समीर कदम यांच्यासह काही मातब्बरांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे.