शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मिरज मतदारसंघात सुरेश खाडे यांच्याविरोधात शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:00 IST

मिरज मतदारसंघात पाच वर्षापूर्वी भाजपचे सुरेश खाडे यांनी तब्बल ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांना सुमारे १८ हजाराचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी व स्वाभिमानी उमेदवारात झालेल्या मतविभाजनामुळे भाजपचे मताधिक्य कमी झाले तरी,

ठळक मुद्दे९ हजार मतदारवाढ गत विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांची वाढलेली संख्या ९८००, लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेली संख्या ३२६०.

सदानंद औंधे ।मिरज : गेल्या पाच वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य देणाऱ्या मिरज मतदारसंघात आगामी विधानसभेला मतदारांची संख्या नऊ हजाराने वाढली आहे. मंत्री सुरेश खाडे यांना टक्कर देण्याचे आव्हान विरोधकांसमोर आहे. मिरजेत भाजपचे तगडे उमेदवार मानले जाणारे मंत्री खाडे यांच्याविरोधात यावेळी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता आहे.

मिरज मतदारसंघात पाच वर्षापूर्वी भाजपचे सुरेश खाडे यांनी तब्बल ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांना सुमारे १८ हजाराचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी व स्वाभिमानी उमेदवारात झालेल्या मतविभाजनामुळे भाजपचे मताधिक्य कमी झाले तरी, गत विधानसभा निवडणुकीएवढीच ९२ हजार मते लोकसभेसाठी मिळाली आहेत. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून २० हजार मते मिळविल्यानंतरही आ. खाडे यांनी ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला होता. गेल्या पाच वर्षात मिरज तालुक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविणाºया भाजपने लोकसभा निवडणुकीत पुन्हा मताधिक्य मिळवून वर्चस्व राखले आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपने मताधिक्य मिळविल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. मिरज पूर्व भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे.

मिरज मतदारसंघात दलित व मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय असल्याने गत विधानसभा निवडणुकीत आ. सुरेश खाडे यांना ६४ हजाराचे मताधिक्क्य मिळाले असले तरी, शहरात मात्र केवळ १० हजाराचे मताधिक्य होते. मतदारसंघातील मालगाव, बेडग, म्हैसाळ, आरग, भोसे, कवलापूर या प्रमुख गावांसह ४९ पैकी ४८ गावात आ. सुरेश खाडे यांनी मताधिक्य मिळविले. केवळ मल्लेवाडी गावात राष्टÑवादी उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी ५५७ मतांची आघाडी मिळाली होती. मिरज मतदार संघातून तिसऱ्यांदा कोणाला संधी मिळत नाही, असा समज आहे. मात्र मंत्री खाडे सलग तिसºयांदा निवडून येण्याचा विक्रम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मिरजेतून दोन वेळा निवडून येणाºया खाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद असल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह आहे.वाढलेला टक्का चर्चेचा२०१४ चे विधानसभा निवडणूक मतदान असे : आ. सुरेश खाडे ६४०६७ मते, तानाजी सातपुते (शिवसेना) २०१६०, सिध्दार्थ जाधव (काँग्रेस) २९७२८, बाळासाहेब होनमोरे (राष्टÑवादी) १०९९९, चंद्रकांत सांगलीकर (अपक्ष) २१५९८. मतदारसंघातील एकूण गावे ४९, एकूण मतदान केंद्रे ३१०, एकूण मतदार ३ लाख २५ हजार ४४५, पुरुष १ लाख ६६ हजार ९७६, स्त्रिया १ लाख ५८ हजार ४५३, तृतीयपंथी १६. गत विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांची वाढलेली संख्या ९८००, लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेली संख्या ३२६०.

टॅग्स :PoliticsराजकारणSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूक