शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाच्या थकबाकीपोटी दुकान सील

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

महापालिकेची कारवाई : मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम तीव्र; हॉटेल कचराप्रश्नी चालकाला दंड

सांगली : महापालिकेच्या थकीत करासाठी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी घरपट्टी विभागाने एक लाख ६४ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी हरभट रस्त्यावरील दुकानगाळा सील केला. कर निर्धारक व संकलक रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कर थकबाकी वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता व एलबीटी विभागातील वसुली कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेशही दिले होते. आयुक्तांच्या दणक्यानंतर घरपट्टी विभागाने शुक्रवारी हरभट रस्त्यावरील भगवती विजय कॉम्प्लेक्समधील दिनेश पवार यांचा दुकानगाळा सील केला. त्यांच्याकडे एक लाख ६४ हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी पालिकेने वारंवार नोटिसा बजाविल्या होत्या. पण त्यांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, आरोग्य विभागाने हॉटेल कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवरील कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या हॉटेलमधील खरकटे कंटेनर्सच्या आसपास टाकण्यात आले होते. त्याबद्दल हॉटेलचालकाला तीस हजार रुपयांचा दंड करण्यात आला. वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. चारूदत्त शहा, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अरुण सूर्यगंध, रवी साबळे यांनी ही कारवाई केली. पालिकेने हॉटेल कचरा विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)ओपन जीम : पालिकेत आज प्रात्यक्षिकमहापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर एका ठिकाणी ‘ओपन जीम’ची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सॅमसन इंडस्ट्रिज या नाशिकस्थित कंपनीकडून शनिवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी दहा वाजता प्रात्याक्षिक आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे महापौर हारूण शिकलगार यांनी सांगितले. सहाशे जणांना नोटीसमहापालिकेच्या घरपट्टी विभागाने शहरातील २५ हजाराहून अधिक रक्कम थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. अशा सहाशे थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोेटीसीची मुदत संपताच वसुलीसाठी कारवाई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.