संख : संख (ता. जत) येथे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या आदेशाने अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांचे पथक व दक्षता समितीने रवींद्र वस्त्र निकेतन हे कापड दुकान सील केले. ही कारवाई गुरुवारी दुपारी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद असताना रवींद्र वस्त्र निकेतन कापड दुकान शटर बंद करून सुरू होते. नियमांचे उल्लंघन केल्याने कापड दुकान सील केले.
यावेळी तलाठी राजेश चाचे, एन. एस. कुंभार, मंडल अधिकारी एस. आर. कोळी, सरपंच मंगल पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर कोळी, माजी उपसरपंच एम. आर. जिगजेणी, ग्रामसेवक के. डी. नरळे उपस्थित होते.