शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांना कात्री

By admin | Updated: February 17, 2016 01:07 IST

प्रतिसाद चांगला पण.. : अपुरे मनुष्यबळ अन् अपुरा निधी

शोभना कांबळे -- रत्नागिरी -वसुली होत नसल्याच्या कारणांवरून अनुसूचित जाती व नवबौद्धांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनेक योजनांना कात्री लावण्यात आली आहे. आता केवळ दोनच योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत आहे. या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कार्यालयाला वसुलीसाठीही अनेक अडचणी येत आहेत.अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी १९७८ साली महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागांतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना झाली. मागासवर्गीयांच्या विकासाच्या दृष्टीने महामंडळ राज्य शासन आणि केंद्र शासन पुरस्कृत योजना राबवत आहे. राज्य शासनाच्या ५० टक्के अनुदान योजना, प्रशिक्षण योजना आणि बीज भांडवल योजना या तीन योजना, तर केंद्राच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळाच्या मुदती कर्ज, सीड कॅपिटल योजना, सूक्ष्मपत पुरवठा, महिला समृद्धी योजना, महिला किसान योजना, उच्च शैक्षणिक योजना, नारी आर्थिक सबलीकरण योजना, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाच्या मुदती कर्ज योजना, सूक्ष्मपत पुरवठा, महिला समृद्धी योजना, महिला अधिकारिता योजना, शैक्षणिक कर्ज योजना आदी योजनांचा समावेश होता.सुरूवातीला यापैकी काही योजना सुरू होत्या. त्यातच महामंडळाकडे मनुष्यबळ कमी असल्याने दिलेल्या कर्जाची वसुली करणे अवघड होऊ लागले. त्यामुळे यापैकी बऱ्याचशा योजना बंद करण्यात आल्या. त्यामुळे मागासवर्गीयांसाठी असलेल्या या योजनांचा लाभ लाभार्थींना मिळणे बंद झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वी राज्य शासनाच्या ५० टक्के अनुदान योजना, प्रशिक्षण योजना आणि बीज भांडवल योजना या तीन योजना सुरू होत्या. त्यासाठी लाभार्थीही मिळत होते. मात्र, अचानक निधी नसल्याचे कारण सांगत शासनाने मागासवर्गीय बेरोजगारांना विविध व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी असलेली प्रशिक्षण योजना बंदच करून टाकली. त्यामुळे आता ५० टक्के अनुदान योजना आणि बीज भांडवल योजना या दोनच योजना सुरू आहेत. यापैकी २०१४ - १५ साली ५० टक्के अनुदान योजनेचा लाभ ३० जणांनी, तर बीज भांडवल योजनेचा लाभ १७ जणांनी घेतला आहे. २०१५-१६ यावर्षी दोन्ही योजनांचे लाभार्थी अनुक्रमे १३ आणि सहा असे आहेत.अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका रत्नागिरीतील महामंडळाच्या कार्यालयाला बसत आहे. या कार्यालयाचा कारभार सांभाळणारा मुख्य अधिकारीच २०११ सालापासून नाही. मात्र, या चार वर्षांच्या कालावधीत हे रिक्त पद भरण्याची गरज महामंडळाला वाटत नाही. मागासवर्गीयांसाठी असलेली अनेक महामंडळे आज बंद आहेत. त्यामुळे सुरुवातीला महामंडळाने अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरी आता निधीअभावी ही महामंडळे निष्प्रभ ठरली आहेत.महात्मा फुले मागासवर्गीय विकास आर्थिक महामंडळातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध मागासवर्गीयांसाठी स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी राज्यात प्रशिक्षण योजना राबविली जाते. या योजनेमुळे अनेक मागासवर्गीयांना विविध प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध होत होती. मात्र, आता ही योजनाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्थिक दुर्बल अशा मागासवर्गीयांना प्रशिक्षण घेण्याची दारे बंदच झाली आहेत.मागासवर्गीय महिलांच्या उन्नतीसाठी महिला समृद्धी योजना (३० हजार प्रकल्प मर्यादा), महिला किसान योजना (५० हजार प्रकल्प मर्यादा) जाहीर झाल्या होत्या. मात्र, मागासवर्गीय महिलांच्या उद्योजकतेचा विकास करणाऱ्या या योजनाही कधी बंद झाल्या तेही कळले नाही.कर्जाचंी वसुली होत नसल्याने यापैकी अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याचे चित्र अनेक महामंडळांमध्ये दिसून येते. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिक कामाचा भार टाकला जात आहे.