शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
5
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
6
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
7
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
8
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
9
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
10
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
11
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
12
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
13
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
14
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
15
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
16
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
17
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
18
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
19
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
20
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

सांगलीत उद्यापासून शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा

By admin | Updated: January 9, 2015 00:25 IST

युवराज नाईक : जिल्ह्याला दुसऱ्यांदा बहुमान

सांगली : सांगलीकरांना उद्यापासून मल्लखांब खेळाच्या चित्तथरारक कसरती पाहावयास मिळणार आहेत. तरुण भारत स्टेडियममध्ये ६० व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक व बापू समलेवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सांगली जिल्हा अ‍ॅमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन व तरुण भारत व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १० व ११ जानेवारी रोजी तरुण भारत स्टेडियममध्ये या स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी भव्य व्यासपीठ, दोन पुरलेले मल्लखांब व एक दोरीवरील मल्लखांबाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी तीन प्रशस्त गॅलऱ्या उभारण्यात आल्या आहेत. आज जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्पर्धास्थळाची पाहणी केली. यावेळी आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक बापू समलेवाले, तरुण भारत मंडळाचे सचिव महेश पाटील, सुधाकर जमादार, दीपक सावंत, सुरेश लांडगे उपस्थित होते. स्पर्धेत १६ राज्यांतील २५० पेक्षा अधिक नामवंत खेळाडू सहभागी होतील. खेळाडू व प्रशिक्षकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंगापूरच्या खेळाडंूची प्रात्यक्षिके सांगलीकरांना पाहावयास मिळतील. जिल्ह्यावर विविध खेळांच्या राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची बरसात होत आहे. जिल्ह्यास शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा आयोजनाचा बहुमान दुसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी मिरजेच्या भानू तालमीत या स्पर्धा पार पडल्या होत्या. (प्रतिनिधी)