शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने विद्यार्थी वळले मजुरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

जत : आधीच दुष्काळी तालुका, त्यात कोरोना महामारीमुळे शाळा बंद. ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नाही. यासाठी शालेय विद्यार्थी आता ...

जत : आधीच दुष्काळी तालुका, त्यात कोरोना महामारीमुळे शाळा बंद. ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नाही. यासाठी शालेय विद्यार्थी आता घरातील आई-वडिलांच्या मदतीसाठी कामाला जात असल्याचे चित्र जत तालुक्यात दिसत आहे. यामुळे जत तालुक्यात बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे.

शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्याने महामारीपासून तालुक्यासह परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. पण महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही सुट्टी तब्बल दोन वर्षावर गेली. सतत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले व पालकांच्या हाताला काम नसल्याने शालेय विद्यार्थी आता मजुरीकडे वळले आहेत.

जत तालुक्यात जवळ-जवळ ३५० च्यावर प्राथमिक शाळा आहेत. तर ५ किलोमीटर अंतराने माध्यमिक शाळा उपलब्ध झाल्या आहेत. या शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करीत असतात. परंतु, गतवर्षीपासून काही दिवसांचा अपवाद वगळता शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज शिक्षणापासून दूर जाण्याची वेळ आली आहे. एक वर्षापासून शाळेचे कुलूप उघडले नाही. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांना कामात मदत करण्यासाठी कामावर जावे लागत आहे. बाल मजुरांची संख्या वाढली आहे.

शिक्षण घेण्याच्या वयात काम करावे लागत असल्याने या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यासह परिसरातील अनेक शाळेतून शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबातील आहेत. ज्याचे पालक ऊसतोडणी मजूर, विटकामगार, कामगार, शेतगडी, हमाल तर काही मजूर वर्ग असल्याने यांची बालके आपल्या मुलाला शिक्षण द्यावे, या उद्देशाने शाळेमध्ये प्रवेश करीत असतात. परंतु कोरोनामुळे गतवर्षीपासून शाळा बंद असल्याने सर्व विद्यार्थी घरीच आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आई- वडिलांच्या कामात मदत करीत असल्याचे दिसून येत आहे. तर काही विद्यार्थी खेळाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते विद्यार्थी इंटरनेट खेळाकडे वळली आहेत.