शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

तांत्रिक बिघाडामुळे शिष्यवृत्तीचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:17 IST

सांगली : सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे महाविद्यालयीन, डी. एड्., अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वर्षभरापासून मिळाली नाही. याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी वंचित : प्रशासनाकडून आश्वासनशासनाकडून वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी काही विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक चुकांमुळे शिष्यवृत्ती मिळाली नाही

सांगली : सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे महाविद्यालयीन, डी. एड्., अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वर्षभरापासून मिळाली नाही. याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे, शासनाकडूनच मिळाली नसल्याची उत्तरे शाळा प्रशासनाकडून मिळत आहेत. म्हणून मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास विद्यार्थ्यांसह विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी आठवड्यात शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे सांगितले. मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात म्हणूनच शासनाने शिष्यवृत्ती सुरु केली आहे.

शैक्षणिक पुस्तके, प्रवेशासाठी पैशाची मदत होण्यासाठी शिष्यवृत्ती सुरु आहे. पण, प्रत्यक्षात शासकीय उदासीन कारभारामुळे महाविद्यालयीन, डी. एड्. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना कधीच वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही. यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक संकटातच पूर्ण होत आहे. म्हणूनच राज्य शासनाकडून वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

२०१६-१७ शैक्षणिक वर्ष संपले असून, दुसरे शैक्षणिक वर्षे सुरु झाले आहे. तरीही विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीमधील पैसे मिळाले नाहीत. यामुळे चालू वर्षातील शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसांत शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्यास विविध विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय विभागाकडील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त सचिन कवले यांनी बहुतांशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. काही विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक चुकांमुळे शिष्यवृत्ती मिळाली नाही. येत्या आठ दिवसात सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.