शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महापालिकेच्या घंटागाडी डब्यात घोटाळा

By admin | Updated: October 15, 2015 00:30 IST

चौकशीचे आदेश : पाचशे डबे खरेदी करूनही प्रभाग वंचितच; १२ लाखांचा खर्च गेला कचऱ्यात!

सांगली : महापालिकेच्या घंटागाडीतील फायबर डब्यांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. पालिकेने पाचशे डबे खरेदी केले होते. हे डबे मिरजेत वाटल्याचा दावा केला जात आहे, तर मिरजेचे नगरसेवक, डबेच मिळाले नसल्याची तक्रार करीत आहेत. सांगलीच्या वाट्याला डबेच आलेले नाहीत, मग पाचशे डबे गेले कुठे? असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. स्थायी समिती सभापती संतोष पाटील व आयुक्त अजिज कारचे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका क्षेत्रात कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक कंटेनर कचऱ्याने भरून वाहत आहेत. पण वाहनेच नादुरुस्त असल्याने कचरा उठाव झालेला नाही. स्वच्छतेच्या कामाकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यात आता घंटागाडीतील डब्यांची खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. घंटागाडीतील डबे तुटल्याने कचऱ्याची वाहतूक करणे मुश्किलीचे झाले होते. कचरा गोळा केला तरी तो कंटेनरपर्यंत नेताना पुन्हा रस्त्यावर पडत होता. याची दखल घेत ८०० डबे खरेदीला मान्यता देण्यात आली. त्यासाठी सुमारे १२ लाख रुपयांंचा खर्च अपेक्षित होता. आरोग्य विभाग गेल्या काही महिन्यांपासून ५०० डबे खरेदी केल्याचे सांगत आहे. या डब्यांचे मिरजेत वाटप केल्याचा दावा केला आहे. मिरजेतील स्वच्छता निरीक्षक, मुकादमांनी थेट ठेकेदारांकडून डबे नेल्याचे समजते. पण मिरजेतील नगरसेवकांनी मात्र डबे मिळाले नसल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. मिरजेत डबे मिळाले नाहीत, तर गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगलीतील नगरसेवकांनी अनेकदा आयुक्तांची भेट घेऊन घंटागाड्यांसाठी डब्यांची मागणी केली. पण त्यांच्यापदरी नेहमीच निराशा आली आहे. आता उर्वरित तीनशे डबे खरेदी करून ते सांगली व कुपवाडला दिले जाणार असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. पण पाचशे डब्यांचे काय? याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. बुधवारी आयुक्त अजिज कारचे यांची काही नगरसेवकांनी भेट घेतली. तेव्हा डबेच गायब असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच स्थायी समितीच्या सभेतही हा विषय गाजला. आरोग्य विभागाने पाचशे डबे खरेदी केले असताना नव्याने ८०० डबे खरेदीचा नवा प्रस्ताव समोर आणला आहे. त्यामुळे जुन्या खरेदीत घोटाळा झाल्याचे दिसून येते. त्यातून सारवासारव करण्यासाठी नवीन प्रस्ताव आणल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. सभापती संतोष पाटील यांनीही या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश उपायुक्त सुनील पवार यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)प्रकरण वादग्रस्त : आरोग्य अधिकाऱ्यांचे घूमजावस्थायी समितीत डबे खरेदीचा विषय गाजल्यानंतर नगरसेवकांनी आयुक्त कारचे यांची भेट घेतली. आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी आयुक्तांकडे डबे खरेदीची फाईल असल्याचा खुलासा केला होता; पण आयुक्त कार्यालयात ही फाईलच आलेली नव्हती. त्याबाबत आंबोळे यांना विचारता, त्यांनी घूमजाव करीत उपायुक्तांकडे फाईल आहे, असे उत्तर दिले. आयुक्तांनी तात्काळ ती फाईल घेऊन या, असा आदेश आंबोळेंना दिला. फाईल आणण्यासाठी आंबोळे आयुक्त कार्यालयातून बाहेर पडले, ते पुन्हा परतलेच नाहीत. आयुक्तांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते उपायुक्त कार्यालयाकडे न जाता थेट मुख्यालयातून बाहेर गेल्याचे दिसत होते. आयुक्तांनीही अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली. रिक्षा घंटागाडीस दिली मान्यतामहापालिकेच्या चार प्रभाग समित्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रिक्षा घंटागाडीचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी चार रिक्षा घंटागाड्या खरेदीस स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. विस्तारित भाग व उपनगरांतील कचरा जमा करण्यासाठी या घंटागाड्यांचा वापर केला जाणार असल्याचे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले.