शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्याच्या सुनावणीपूर्वी संचालकांचे देव पाण्यात

By admin | Updated: April 23, 2016 00:57 IST

स्थगितीने दिलासा : १५७ कोटीच्या घोटाळ्यातून मुक्त होण्यासाठी धडपड

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात येत्या २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याने, यात अडकलेल्या विद्यमान संचालकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. निकालपूर्व सहकार विभागाच्या चौकशीला स्थगितीच्या आदेशाने थोडा दिलासा मिळाला असला तरी, अंतिम दिलासा मिळण्याची अपेक्षा उंचावली आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार, लेखापरीक्षण सुरू झाल्यापासून पाच वर्षापेक्षा जुन्या प्रकरणांची चौकशी करता येत नाही. या नियमाच्या आधारावर बँकेच्या विद्यमान संचालकांनी सहकार विभाग तसेच न्यायालयीन लढाई लढण्यास सुरुवात केली आहे. सहकार विभागाने प्रतिसाद दिला नसला तरी, आता न्यायालयीन लढाईत या नियमाचा विचार होईल, अशी आशा संचालकांना वाटत आहे. १५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये बहुतांश प्रकरणे ही पाच वर्षापेक्षा जुनी आहेत. त्यामुळे या नियमाचा विचार करून विद्यमान संचालकांना घोटाळ्यातील आरोपातून मुक्त होण्याची आशा आहे. त्यामुळेच त्यांची लढाई सुरू आहे. राज्य बॅँकेच्या चौकशीत संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी एका प्रकरणात पाच वर्षामागील जुन्या प्रकरणांतून तत्कालीन संचालकांना वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निकालाचा आधारही विद्यमान संचालकांनी घेतला आहे. न्यायालयाने सरकारला म्हणणे मांडण्यासाठी २७ एप्रिल रोजी मुदत दिली आहे. त्या दिवशी याचिकेवर अंतिम निकाल दिला जाणार आहे. दरम्यान, तोपर्यंत या दोन्ही चौकशा स्थगित ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात कायमचा दिलासा मिळण्यासाठी संचालकांनी देव पाण्यात ठेवले आहे. या प्रकरणातील चौकशी अधिकारी, सहकार विभाग, जिल्हा बँकेतील पदाधिकारी, प्रशासन आणि राजकीय मंडळींचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)