शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोनशे कोटींचे कर्ज

By admin | Updated: September 3, 2014 00:04 IST

वसंतदादा कारखाना : वसुलीसाठी मालमत्तेचे मूल्यांकन सुरू

मिरज : सांगलीतील वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकित ४६ कोटी ऊस बिलाच्या वसुलीस प्रतिसाद दिला नसल्याने कारखान्याच्या १७४ एकर मालमत्तेचे सह दुय्यम निबंधकांकडून मूल्यांकन करण्यात येत आहे. १७४ एकर जमीन असलेल्या कारखान्याच्या सातबाऱ्यावर सुमारे २३५ कोटींचे कर्ज व थकबाकी आहे. गत हंगामातील शेतकऱ्यांच्या उसाची बिले दिली नसल्याने साखर संचालकांच्या आदेशानुसार मिरजेच्या तहसीलदारांनी ४६ कोटी वसुलीसाठी वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेची जप्तीसाठी नोटीस बजावली आहे. कारखान्याने नोटिसीला प्रतिसाद दिला नसल्याने दि. २८ रोजी तहसीलदारांनी दुसरी नोटीस दिली आहे. दि. १३ रोजी दुसऱ्या नोटिसीची मुदत संपल्यांनतर तिसऱ्या नोटिशीनुसार कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची जप्ती व लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कारखाना व्यवस्थापनाने थकित ऊस बिलाची रक्कम अद्याप जमा केली नसल्याने तहसीलदार किशोर घाडगे यांनी कारखान्याच्या मालकीच्या सांगलीतील विविध ठिकाणी असलेल्या १७४ एकर जमिनीच्या मूल्यांकनाची सह दुय्यम निबंधकांकडे मागणी केली आहे. मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रियेसाठी कारखान्याच्या मालमत्तेचे मूल्यांकन निश्चित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे जिल्हा मध्यवर्ती, बँक आॅफ इंडिया, विक्रीकर, व्यवसाय कर, ऊसबिल देय थकबाकी अशी यापूर्वीची २३५ कोटी थकबाकीची सातबारा उताऱ्यावर नोंद आहे. त्यात नवीन ४६ कोटी ऊस बिल थकबाकीची भर पडली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्याची थकित देणी भागविण्यासाठी २१ एकर जमीन विक्रीस शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र कारखान्याकडून थकित महसूल वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याने जमिनीची विक्री करता येणार नाही. यामुळे कारखान्याच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. सुमारे अडीचशे कोटी कर्जाचा डोंगर असलेल्या वसंतदादा कारखान्याचे व्यवस्थापन कसा मार्ग काढणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. (वार्ताहर)