शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

सव्वाकोटी कागदपत्रे डिजिटल

By admin | Updated: January 2, 2017 23:27 IST

जिल्ह्यातील यंत्रणा बदलली : दाखले, नकाशांचा प्रवास सुलभ होणार

अविनाश कोळी ल्ल सांगलीविविधरंगी रुमालात गुंडाळलेली कागदपत्रे, त्यावर बसलेली धूळ, रेंगाळणारी दाखल्यांची प्रक्रिया आणि यासाठीच्या कटकटींमुळे महसुली विभागांपासून दूर पळणारी जनता असे वर्षानुवर्षाचे चित्र आता बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. ई-महाभूमीअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सव्वाकोटी कागदपत्रांना संगणकीय कपाट मिळाले आहे. सांगलीच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयामध्ये संगणकीकरणाची ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्यात या प्रक्रियेच्या बाबतीत सांगली जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेबाबत अधिक गतीने पावले टाकल्यामुळे महत्त्वाच्या अभिलेखांचे आता संगणकीकरण झाले आहे. राज्यात एकूण २६ कोटी ४१ लाख अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात येणार असून, यापैकी सांगली जिल्ह्यात सव्वा कोटी अभिलेखांचे स्कॅनिंग आणि नोंदी झाल्या आहेत. यामध्ये जुने सात-बारा, फेरफार उतारा, चालू खाते उतारा, कूळ नोंदवही, इनाम नोंदवही, तसेच भूमी अभिलेखकडील टिपण, आकारबंद, गुणाकार बुक, आकारफोड, कमी-जास्त पत्रक, मिळकत पत्रिका, चौकशी नोंदवही, मालमत्ता नोंदवही आदी कागदपत्रांचा समावेश आहे. असे बहुतांश अभिलेख आता संगणकीय कपाटात बंद झाले असून, ते लवकरच सर्वांसाठी कायमचे खुले होणार आहेत. विजयनगर येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातही यापुढे कागदपत्रांचे गठ्ठे कोठेही दिसणार नाहीत. तहसील कार्यालयांनाही अशाच आधुनिक अभिलेख कक्षांचे दर्शन घडणार आहे. तालुकास्तरावर उदासीनता संगणकीय अभिलेख तयार असताना विटा तहसील कार्यालय वगळता अन्य तालुकास्तरावरून ही प्रणाली सुरू करण्याबाबत उदासीनता दिसत आहे. यंत्रणा बदलली असल्याने, संबंधित कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आता जुनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. घरबसल्याही दाखले पाहणे शक्यसंपूर्ण राज्यातील तहसीलदार आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयाकडील महत्त्वाच्या व जुन्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे एकत्रीकरण करून ते संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात येणार असल्याने घरबसल्याही दाखले पाहता येऊ शकतील. शासकीय यंत्रणेचे नियंत्रणनोंदीची प्रक्रिया खासगी यंत्रणेमार्फत झाली असली तरी, त्यावर शासकीय अधिकाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण होते. पूर्ण खातरजमा झाल्यानंतरच तालुकानिहाय डाटा एकत्रिकरण करण्यात आले आहे. तीन वर्षांपासून डाटा एन्ट्रीचे काम सुरूगेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भातील डाटा एन्ट्रीचे (दस्तांची संगणकीय नोंद) काम सांगलीत सुरू होते. फाटक्या कागदपत्रांच्या नोंदी करताना अनेक अडचणी आल्या होत्या.