शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराकडे पाच लाखाच्या खंडणीची मागणी

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

सांगलीतील प्रकार : व्यापाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा : कामगारास अटक

सांगली : सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन परवानाधारक सावकाराकडेच पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार आज (मंगळवार) रात्री उघडकीस आला. धीरजकांत सुभाषचंद्र गुप्ता (रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, वसंतदादा साखर कारखाना परिसर, सांगली) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय श्रीनारायण सारडा व प्रकाश मोहनलाल मुंदडा (वय ४२, रा. भारत कॉम्प्लेक्स, रतनशीनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुंदडा यास अटक करण्यात आली आहे. सारडा याची हरभट रस्त्यावर फोटो लॅब आहे. मुंदडा हा त्याच्या लॅबमध्ये कामाला आहे.गुप्ता यांनी चार ते पाच वर्षांपूर्वी सावकारीचा व्यवसाय बंद केला आहे. ते सावकारी करीत होते, त्यावेळी मुंदडाने त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशाची त्याने परतफेड केली आहे. सध्या त्यांच्यात कोणताही आर्थिक व्यवसाय नव्हता. तरीही काही दिवसांपूर्वी सारडाने त्यांच्याशी संपर्क साधून, मुंदडा याने माझ्या लॅबमध्ये २० लाखांचा अपहार केला आहे. यातील पाच लाखांची रक्कम त्याने तुमच्याकडून घेतलेल्या पैशाचे व्याज देण्यासाठी तुम्हाला दिली आहे. ही रक्कम तुम्ही मला परत करा, अन्यथा तुमच्याविरुद्ध सावकारीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली.या प्रकारानंतर गुप्ता यांनी सारडा यांना समजावले. मात्र तो काहीही ऐकत नव्हता. यामध्ये मुंदडाही सहभाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे गुप्ता यांनी पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सावंत यांनी याप्रकरणी गुंडाविरोधी पथकास चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप बुवा यांनी चौकशी करुन आज गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)