शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-Local Body Election: आटपाडीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एक उमेदवार कोट्यधीश, बाकी लक्षाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:23 IST

उमेदवारांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता

लक्ष्मण सरगर

आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या ऐतिहासिक थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. थेट लढतीत चार उमेदवार मैदानात होते आणि निवडणूक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रांमधील स्थावर व जंगम मालमत्तेच्या तपशीलातून उमेदवारांची आर्थिक स्थिती स्पष्ट झाली.

सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पोपट पाटील यांनी, कारण ते या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून समोर आले. त्यांच्या नावावर तब्बल एक कोटी ८० लाख ४२ हजार रुपयांच्या मालमत्तेची नोंद आहे.या थेट निवडणुकीत एका बाजूला कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही हजार रुपयांवर समाधान मानणारा अपक्ष उमेदवार, अशा आर्थिक फरकाने ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे तर आर्थिकदृष्ट्या तुलना करणारी ठरली. सर्वाधिक मालमत्ता असलेले उमेदवार सौरभ पोपट पाटील यांच्या नावावर १,८०,४२,००० रुपयांची संपत्ती आहे. नव्या पिढीचा चेहरा, आर्थिक क्षमता आणि मजबूत प्रचारयंत्रणा असल्यामुळे त्यांची उमेदवारी विशेष ठरली.दुसऱ्या स्थानावर भाजपचे उमेदवार उत्तम तायप्पा जाधव आहेत. ज्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत ८१,७८,२६९ रुपये आहे. भाजपची संघटनशक्ती आणि जाधव यांचा सामाजिक प्रभाव या आर्थिक पायावर निर्णायक ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गटाचे रावसाहेब शिवाजी सागर असून, त्यांच्या नावावर ४०,८२,५५० रुपयांची मालमत्ता आहे. उर्वरित उमेदवारांमध्ये सर्वांत वेगळे ठरले अपक्ष गुरुप्रसाद अतुल कवडे. त्यांच्या नावावरची मालमत्ता केवळ ६६,००० रुपये असून, आर्थिक दृष्ट्या साधारण कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराला लोकांनी विशेष लक्ष दिले. ‘सामान्यांचा उमेदवार’ अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. मात्र, त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार रावसाहेब सागर यांना पाठिंबा दिला होता.दरम्यान, नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत आटपाडीकरांनी उत्साहाने मतदान करून ७९.६२ टक्के मतदानाची नोंद केली. चारही उमेदवारांची निवड ईव्हीएममध्ये बंदिस्त झाली असून, निकाल दि. २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

तालुक्याचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालाकडेमतदान पार पडले असले तरी चर्चेचा मुख्य मुद्दा अजूनही कायम आहे तो म्हणजे कोणता उमेदवार किती श्रीमंत? प्रतिज्ञापत्रांमधील तपशील समोर आल्यानंतर जनतेत निकालाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. आटपाडीकरांनी नेमकं कोणावर विश्वास ठेवला आहे, याचा निर्णय दि. २१ डिसेंबरला होणार असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Atpadi Election: One Crorepati, Others Lakhpatis in Nagaradhyaksha Race

Web Summary : Atpadi Nagar Panchayat election sees a crorepati candidate leading. Other candidates possess significant assets, while one independent candidate has minimal wealth. The election recorded 79.62% voter turnout; results are due December 21st.