शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सातारची ठिणगी... आंदोलनाची नव्हे दरोड्याची

By admin | Updated: June 1, 2017 23:29 IST

सातारची ठिणगी... आंदोलनाची नव्हे दरोड्याची

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप सुरू होण्यापूर्वीच बुधवारी रात्री साताऱ्यात आंदोलनाची ठिणगी पेटल्याचा गवगवा सोशल मीडियावर झाला... शेतकरी आंदोलकांनी दुधाचा टँकर फोडल्याचे छायाचित्रही प्रत्येकाच्या मोबाईलवर झळकले. मात्र, हे आंदोलक नसून अज्ञात दरोडेखोर असल्याचा शोध गुरूवारी सकाळी सातारा पोलिसांना लागला. याबाबतची अधिक माहिती अशी की पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान एका दूध टँकरवर बुधवार, दि. ३१ रोजी रात्री नऊच्या सुमारास दगडफेक झाली होती. बळीराजा गुरुवारपासून संपावर गेला आहे. यातूनच दगडफेक झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर पसरत होती. मात्र, दगडफेक झालेला तो प्रकार दरोड्यातील असल्याचे निष्पन्न झाले.याबाबत माहिती अशी की, सातारा शहराजवळील वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान सातारा येथे दोघांनी एक दूध टँकर अडवून त्यावर दगडफेक केली. त्यानंतर टँकर चालकाला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता जबरदस्तीने दारू दुकानापर्यंत ओढत नेऊन चालकाच्या खिशातील तेराशे रुपये जबरदस्तीने काढून मारहाण केली. तसेच टँकरच्या काचा फोडून नुकसान केले आहे. याबाबत दोघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.