शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात बंद कडकडीत पाळणार

By admin | Updated: June 4, 2017 23:06 IST

साताऱ्यात बंद कडकडीत पाळणार

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्य शासनाने शेतकरी विरोधी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ सोमवारी सातारा बंद पाळण्यात येणार आहे. या बंदला सर्व क्षेत्रांतील लोकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेतकरी-कामगार संयुक्त कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कृती समितीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सातारा बंद पाळण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी साडेनऊला गांधी मैदानापासून पदयात्रा काढण्यात येणार आहे. राजवाडा ते मोती चौक-कर्मवीर भाऊराव पाटील मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होईल. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने शेतमाल, दूध सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे. कऱ्हाड येथे महात्मा गांधी पुतळा, कोल्हापूर नाका येथून पदयात्रेस प्रारंभ होऊन यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थानावर समारोप होणार आहे.बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळिराजा शेतकरी संघटना, किसान क्रांती संघटना, किसान सभा, सर्व श्रमिक पेन्शनर्स संघटना, सर्व श्रमिक गिरणी कामगार संघटना, सिटू, कामगार शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अर्जुन साळुंखे, राजू शेळके, कॉ. विजय निकम, अलीभाई इनामदार, कॉ. वसंतराव नलवडे, कॉ. अस्लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, कॉ. शंकर पाटील, रमेश पिसाळ, शाम चिंचणे, जयवंत बोडके, मोहन साबळे, संजय साबळे, भानुदास साबळे, चंद्रकांत खंडाईत, राजेंद्र साबळे, सलीम आतार बैठकीस उपस्थित होते. बळिराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील कऱ्हाडहून दूरध्वनीद्वारे चर्चेत सहभागी झाले होते. या बंदला सातारकरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. आठवडा बाजारावर शेतकऱ्यांचा बहिष्कारसातारा : नोकरदारांच्या साप्ताहिक सुटीदिवशी रविवारी भरणारा आठवडा बाजार सर्वच व्यावसायिकांसाठी कमाईचा असतो. पण, या बाजारांवर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला. सर्वच ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. जिल्ह्यातील सातारा, खंडाळा, लोणंद, कातरखटाव, मायणी, वाठार किरोली, साप, उंडाळे, पिंपोडे बुद्रुकबरोबरच अनेक मोठ्या शहरांमध्ये रविवारी आठवडा बाजार असतो.