मल्लेवाडीत शेतकरी पॅनेलच्या सर्व ११ जागा निवडून आल्या आहेत. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच विनायक पाटील यांनी, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लेवाडी आदर्श गाव निर्माण करणार असल्याचे सांगितले. उपसरपंच वर्षा भोसले यांनी, निवडणूक काळात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी बुथ अभियानात सहभागी बुथ अध्यक्ष युवक गावचा सरपंच झाल्याबद्दल अभिनंदन केले.
फाेटाे : ०९ विनायक पाटील
फाेटाे : ०९ वर्षा भाेसले
किंवा
फाेटाे : ०९ मिरज १
ओळ : मल्लेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच विनायक पाटील. उपसरपंच वर्षा भाेसले यांचा बाळासाहेब हाेनमाेरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.