शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाव वाचविण्यासाठी सरपंचांनी कठोर निर्णय घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुुरू झाली आहे. रुग्ण संख्याही वाढत असून, हे संकट मोठे आहे. आपण सर्वजण ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुुरू झाली आहे. रुग्ण संख्याही वाढत असून, हे संकट मोठे आहे. आपण सर्वजण मिळून यावर मात करू. पण, आपत्ती नियंत्रणात सरपंच, दक्षता समित्यांनी जबाबदारी लक्षात घ्यावी, कायदेशीर अधिकार वापरावेत. गाव वाचविण्यासाठी प्रसंगी कठोर कारवाई करा, प्रशासन तुमच्यासोबत आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील सरपंच, ग्रामदक्षता समित्यांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, तालुक्‍यांचे गटविकास अधिकारी यांच्याशी डॉ. चौधरी यांनी सोमवारी दुपारी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादात सहभाग घेतला. जिल्ह्यातून ६५० पदाधिकारी, अधिकारी या संवादात सहभागी होते. यावेळी काही सरपंचांना शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले.

डॉ. चौधरी म्हणाले, गावातील प्रत्येक घटकाला वाचविण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी दुकानाबाहेर रिंगण आखा. मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. रुग्ण संख्या ज्या भागात अधिक आहे, तेथे औषध फवारणी करा. होम आयसोलेशन रुग्ण व नातेवाईक बाहेर फिरणार नाहीत, याची खबरदारी घ्या. घरावर तसा बोर्ड लावा. संबंधित रुग्णांच्या हातावर शिक्केही मारा.

जितेंद्र डुडी म्हणाले, गावासाठी वेळ द्या. सामाजिक कार्यकर्ते एकत्र करा. या मोहिमेत शिक्षकांचा सहभाग आपणास मिळेल, तशा सूचना दिल्या आहेत.

चौकट

लक्षणे असतील, तर तपासणी करा

काही सरपंचांनी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या लोकांना क्वारंटाईन करावे का, अशी शंका विचारली. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, तशी काही गरज नाही. कोरोनाची लक्षणे दिसत असतील, तर त्यांची तपासणी करून घ्या. चाचणी पॉझिटिव्ह आली, तरच त्यांना क्वारंटाईन करून उपचार करण्याची गरज आहे.

चौकट

गावांनी शंभर टक्के लसीकरण करावे

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १० हजार रुग्णांना लस दिली गेली आहे. लसीकरण वाढवा. आरोग्य केंद्र, उपकेंद्रात मंडप घाला, खुर्च्या आणा, पिण्याच्या पाण्याची सोय करा. ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती लस घेईल, याकडे सरपंचांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले.