शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सराफास पावणेसहा लाखांना लुटले

By admin | Updated: November 2, 2014 00:39 IST

बेदम मारहाण : अंकली-मिरज रस्त्यावरील घटना; चार लुटारुंचे पलायन

मिरज : अंकली-मिरज रस्त्यावर शुक्रवारी रात्री चौघांनी अथणी येथील सराफ व्यावसायिक विनोद शिवाजी साळुंखे (वय २५) यांच्यासह तिघांना मारहाण करून चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा पावणेसहा लाखांचा ऐवज लुटला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. विनोद साळुंखे यांचे अथणी येथे ‘रवळनाथ ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे. लहान भाऊ महेश साळुंखे, मामा दशरथ किसन लिगाडे यांच्यासोबत साळुंखे शुक्रवारी हुपरी येथे चांदीचे दागिने आणण्यासाठी गेले होते. एमएच ११ बीएच २११२ क्रमांकाच्या मोटारीतून तिघेही मिरजेकडे येत असताना रात्री आठ वाजता अंकलीजवळ मोटारीतून (क्र. एमएच ०४ बीएच ०५१५) आलेल्या चौघांनी साळुंखे यांची मोटार अडवली. ‘पाठीमागे एका मुलीला उडवून पुढे आला आहेस’, असे सांगत चौघांनी मोटार चालविणाऱ्या विनोद साळुंखे यांना मारहाण करून गाडीची किल्ली काढून घेतली. साळुंखे यांचे मामा दशरथ लिगाडे गाडीतून उतरल्यानंतर चोरट्यांनी त्यांनाही माराहाण केल्याने ते रस्त्यालगत उसात गेले. चोरट्यांनी साळुंखे यांची मोटार ताब्यात घेऊन विनोद साळुंखे व महेश साळुंखे यांना मिरजेच्या दिशेने पुढे आणले. मोटार अंधारात थांबवून दोघांना मारहाण करत गावठी पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याजवळील नऊ किलो चांदीचे दागिने, विनोद साळुंखे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील ब्रेसलेट, रोख ८० हजार असा ५ लाख ७२ हजाराचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. विनोद व महेश यांच्या डोक्यात गावठी पिस्तुलाच्या दस्त्याने मारहाण करण्यात आली. दोघांचे हातपाय बांधून मोटारीतून मिरजेत आणण्यात आले. मिरजेत शास्त्री चौकातून शिरोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारीत महेश यांना बांधलेल्या अवस्थेत सोडण्यात आले. विनोद साळुंखे यांना चोरट्यांनी आपल्या मोटारीत घालून शिरोळमार्गे धरणगुत्ती येथे नेऊन उसाच्या शेतात टाक ले. चोरटे दागिने व रोख रक्कम घेऊन फरारी झाले. साळुंखे यांचे मामा दशरथ लिगाडे व मिरजेत मोटारीत बांधून ठेवलेले महेश साळुंखे हे इतरांच्या मदतीने मिरजेत पोलीस ठाण्यात पोहोचले. जबरी चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शिरोळ रस्त्याने चोरट्यांचा शोध घेतला. मात्र चोरटे सापडले नाहीत. अंकली-मिरज रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असताना चोरट्यांनी मारहाण करून सराफास लुटल्याने खळबळ उडाली. जबरी चोरीबाबत विनोद साळुंखे यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस प्रमुख सावंत यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.लुटारु तरुण; मराठीत बोलणारेमराठी बोलणारे चोरटे पॅन्ट, शर्ट अशा पोशाखात होते. चौघेही तरुण होते. साळुंखे यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग करून त्यांना लुटल्याचा पोलिसांचा संशय आहे. मोटारीच्या क्रमांकावरून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. (वार्ताहर)