संजयनगर : सांगली जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर संजयनगर पोलिसांनी १५२ दुचाकी व आठ चारचाकी गाड्या आठ जप्त करून विनामास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी दिली.
सांगली परिसरात कडक लॉकडाऊन सुरू असताना, संजयनगर पोलिसांनी दोन ठिकाणी नाकेबंदी करून विनामास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई करून ४३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. १५२ दुचाकी व आठ चारचाकी वाहने जप्त केली आहेत.
फोटो ओळी : संजयनगर पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी.