शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महावितरणकडून ग्राहकाला शून्य वीजबिल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:50 IST

सांगली : महावितरणच्या अजब कारभाराचा नमुना रविवारी सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका ग्राहकाला चक्क शून्य वीजबिल पाठविताना, मुदतीनंतर दहा रुपये दंडाची तरतूदही त्यात केल्यामुळे ग्राहकाला हे बिल भरायचे कसे?, असा प्रश्न पडला आहे. हरिपूर रोडवरील राहुल महावीर वरड या प्रकारामुळे चक्रावले आहेत.सांगलीत राहणाऱ्या राहुल वरड यांचे हरिपूर हद्दीत एका ...

सांगली : महावितरणच्या अजब कारभाराचा नमुना रविवारी सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका ग्राहकाला चक्क शून्य वीजबिल पाठविताना, मुदतीनंतर दहा रुपये दंडाची तरतूदही त्यात केल्यामुळे ग्राहकाला हे बिल भरायचे कसे?, असा प्रश्न पडला आहे. हरिपूर रोडवरील राहुल महावीर वरड या प्रकारामुळे चक्रावले आहेत.सांगलीत राहणाऱ्या राहुल वरड यांचे हरिपूर हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये छोटे मिठाचे गोदाम व पॅकिंगचा उद्योग आहे. मिठाचे पॅकिंग करून ते दुकानदारांना त्याचा पुरवठा करीत असतात. मे महिन्याचे चालू वीजबिल नुकतेच त्यांच्या हातात पडले. हे बिल शून्य रुपये असल्याने त्यांना फारसा धक्का बसला नाही, पण त्याखाली दंडाचा दिलेला इशारा वाचून त्यांना धक्का बसला. त्यांनी यासंदर्भात महावितरण कंपनीशी संपर्क साधला होता, पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे वरड यांनी सांगितले. यापूर्वीही एप्रिल महिन्यात त्यांना शून्य वीजबिल आले होते. एप्रिल महिन्यातील त्यांचा वीज वापर ७0 युनिट होता. याबाबत तक्रार केल्यानंतर, तांत्रिक चूक असल्याचे कारण सांगून महावितरणच्या अधिकाºयांनी त्यांना १ हजार ८00 रुपयांचे नवीन बिल दिले. त्यांनी ते भरले. पुन्हा मे महिन्यात त्यांना शून्य रुपये बिल आल्याने ते पुन्हा चक्रावले आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा शून्य बिलाचा गोंधळ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. बिल शून्य असेल तर दहा रुपये दंड कसा भरायचा?, असा प्रश्न त्यांना पडला आहे. नेमका हा प्रकार कशामुळे होत आहे हे त्यांना समजलेले नाही. त्यामुळे त्यांनी अधिकाºयांशी संपर्क साधला असता, अ‍ॅडव्हान्स रक्कम भरली असल्यामुळे हे बिल शून्य रुपये आले असल्याचे वरड यांना सांगण्यात आले.तरीही ५ जूनपर्यंत बिल न भरल्यास दहा रुपये दंड मी कसा भरायचा?, असा सवाल त्यांनी अधिकाºयांकडे केल्यानंतर, ही तांत्रिक चूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही वरड यांनी शून्य रकमेचा मी धनादेश महावितरणला देणार असल्याचे सांगितले.महावितरण काय म्हणते...मे महिन्याचे वरड यांचे बिल आॅनलाईन उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांचा मे महिन्याचा वीज वापर ९९ युनिट दिसतो. त्याचे एकूण बिल १ हजार २२२.२६ रुपये दिसते. त्यातून थकबाकी व तडजोडीची रक्कम त्यांनी वजा दाखविल्यामुळे, वीजबिल उणे 0.८२ इतके दिसते. त्यामुळे शून्य बिल आणि त्यावर नियमाप्रमाणे मुदतीनंतर दंडाचा उल्लेख म्हणून १0 रुपये दाखविले आहेत. ही एक तांत्रिक चूक असून त्यामध्ये दुरुस्तीबाबत कल्पना दिल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.