शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाकांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:32 IST

तासगाव : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडूनही याच महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नितीन बानुगडे पाटील यांची वर्णी लावली होती. त्यामुळे आता भाजपकडून, शासन स्तरावर पहिल्यांदा विशेष बाब म्हणून संजयकाकांच्या उपाध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजयकाकांच्या नावाबरोबरच विदर्भ विकास ...

तासगाव : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडूनही याच महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नितीन बानुगडे पाटील यांची वर्णी लावली होती. त्यामुळे आता भाजपकडून, शासन स्तरावर पहिल्यांदा विशेष बाब म्हणून संजयकाकांच्या उपाध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजयकाकांच्या नावाबरोबरच विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येणार आहे.भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना काही महिन्यांपूर्वी कृष्णा खोरे विकास महामंडळावर उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली होती. उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर खासदार पाटील यांनी पाणी योजनांचा आढावा घेत, रखडलेल्या पाणी योजना मार्गी लावण्यासाठी, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पाठपुरावा केला होता. खासदार पाटील यांनी पाठपुरावा करून उरमोडी धरणासाठी ४८२ कोटी रुपये, टेंभूसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत बाराशे तीन कोटी रूपये, म्हैसाळसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये मंजूर करून आणले. टेंभू योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच रखडलेल्या कामांना सुरुवात होणार आहे. मंजूर झालेल्या निधीतून सात ते आठ महिन्यांत बहुतांश कामे मार्गी लागणार आहेत. नुकताच नाबार्डकडून विशेष फंड मंजूर झाल्याने माण, येरळा नदी बारमाही होणार आहे.खासदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे वर्षभरात दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. संजयकाका उपाध्यक्ष असलेल्या महामंडळावरच शिवसेनेकडून नितीन बानुगडे पाटील यांचीदेखील उपाध्यक्ष म्हणून वर्णी लावली होती. त्यामुळे एकाच महामंडळावर दोन्ही पक्षांचे उपाध्यक्ष काम करणार होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संजयकाकांना आणखी एक सरप्राईज गिफ्ट दिले जाणार असून चार दिवसात राज्यमंत्री पदाऐवजी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येणार आहे. यानिमित्ताने जिल्'ातील भाजपला आणखीनच बळकटी मिळणार आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यास, महामंडळाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला मोठा फायदा होणार आहे. राज्य शासनाकडून खासदार पाटील यांच्यासोबतच विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनाही कॅबिनेटचा दर्जा मिळणार असल्याचे संकेत आहेत.